S M L

कोण होणार महाराष्ट्र केसरी? विजय चौधरी का अभिजीत कटके?

Samruddha Bhambure | Updated On: Dec 10, 2016 08:42 PM IST

कोण होणार महाराष्ट्र केसरी? विजय चौधरी का अभिजीत कटके?

10 डिसेंबर :  जळगावचा विजय चौधरी महाराष्ट्र केसरी किताबाची हॅटट्रिक साजरी करणार की पुण्याचा अभिजीत कटके जो पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरीची गदा उचलणार? या प्रश्नाचं उत्तर आज संध्याकाळी 6 वाजता मिळणाराय. महाराष्ट्र केसरीची अंतिम लढाई आज पुण्यात होणार आहे.

महाराष्ट्र केसरीत माती विभागातून विजय चौधरीनं तर मॅट विभागातून अभिजीत कटकेनं अंतिम फेरीत धडक मारली आहे. पुण्यातल्या वारजे मध्ये पार पडत असलेल्या या स्पर्धेत माती आणि मॅट विभागाचे अंतिम सामने झाले. त्यांनतर आज संपूर्ण महाराष्ट्राचा श्वास रोखून ठेवणारी चित्तथरारक लढत होण्याची शक्यता आहे.

डबल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीनं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या माती विभागाच्या अंतिम फेरीत विजय डोईफोडेला चीतपट केलंय. विजयनं उपांत्य लढतीत सांगलीच्या मारुती जाधववर मात केली. त्याआधी त्याने तिसऱ्या फेरीत यवतमाळच्या शुभम जाधवला हरवलं होतं आणि मग साताऱ्याच्या किरण भगतला चीतपट करुन विजय मिळवला होता. महाराष्ट्र केसरीच्या मॅट विभागात अभिजीत कटकेने बाजी मारली आहे. सागर बिराजदारवर मात करत अभिजीतने महाराष्ट्र केसरीची अंतिम फेरी गाठली आहे.

दरम्यान, या अंतिम लढतीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अभिनेता आमिर खान उपस्थिती असणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 10, 2016 12:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close