S M L

सलग तीन दिवसांच्या सुट्टीनंतर आज बँका उघडल्या, बँकांमध्ये मोठी गर्दी

Samruddha Bhambure | Updated On: Dec 13, 2016 11:09 AM IST

सलग तीन दिवसांच्या सुट्टीनंतर आज बँका उघडल्या, बँकांमध्ये मोठी गर्दी

13 डिसेंबर: नोटाबंदीनंतर रांगेत उभं राहण्याची सवय लागलेल्या नागरिकांना आज काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळं बंद असलेल्या बँका सुरु होणार आहेत.  त्यामुळं आज एटीएमबरोबरचं बँकांमध्ये गर्दी पहायला मिळू शकते.

सलग तीन सुट्ट्या आणि एटीएममध्ये असलेल्या खडखडाटामुळं लोकांना अतोनात हाल सहन करावे लागले. मुंबई, पुणे असो किंवा विदर्भ आणि मराठवाडा कुठल्याही एटीएममध्ये पैसे नाहीत. त्यामुळं अर्थातच लोकांना खऱ्या अर्थी कॅशलेस झाल्याचा अनुभव आला. बँका बंद असल्याने नागरिकांना एटीएमच्या शोधात अनेकांना मोठी पायपीटही करावी लागत होती.

पण आज सुट्ट्या संपत असून बँक कर्मचारी पुन्हा कामावर हजर होतील. त्यामुळे आपल्या बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उठू शकते.

दरम्यान, नोटाबंदीचा आज 35 वा दिवस असून, सुट्ट्यापैशांचीही चणचण सर्वत्र कायम आहे. 2000 रुपयांच्या नव्या नोटांचे सुट्टे करताना नागरिकांना तारेवरची मोठी कसरत करावी लागत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 13, 2016 08:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close