S M L

कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात मोडतोड

14 मेपूरग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या जागेची मागणी करत आज कोल्हापुरात दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून काचा फोडल्या. शिरोळ्यामधील पुरग्रस्तांच्या पुर्नवसनाची जागा गेले कित्येक महिने पाठपुरावा करूनही त्यांना मिळालेली नाही. त्यामुळे हे कार्यकर्ते आज जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करण्यासाठी गेले होते. पण जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात प्रवेश नाकारला गेल्याने 100 कार्यकर्त्यांनी दालनाच्या दरवाज्याच्या काचा फोडल्या. शिवाय कार्यालयाचे लोखंडी गेटही तोडून टाकले. या तोडफोडीनंतर जिल्हाधिकार्‍यांना या कार्यकर्त्यांशी चर्चा करावी लागली. त्यात त्यांनी या कार्यकर्त्यांना 11 दिवसांत पुनर्वसनासाठी जागा मिळवून देऊ, असेआश्वासन दिले.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2010 09:59 AM IST

कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात मोडतोड

14 मे

पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या जागेची मागणी करत आज कोल्हापुरात दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून काचा फोडल्या.

शिरोळ्यामधील पुरग्रस्तांच्या पुर्नवसनाची जागा गेले कित्येक महिने पाठपुरावा करूनही त्यांना मिळालेली नाही.

त्यामुळे हे कार्यकर्ते आज जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करण्यासाठी गेले होते. पण जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात प्रवेश नाकारला गेल्याने 100 कार्यकर्त्यांनी दालनाच्या दरवाज्याच्या काचा फोडल्या.

शिवाय कार्यालयाचे लोखंडी गेटही तोडून टाकले. या तोडफोडीनंतर जिल्हाधिकार्‍यांना या कार्यकर्त्यांशी चर्चा करावी लागली. त्यात त्यांनी या कार्यकर्त्यांना 11 दिवसांत पुनर्वसनासाठी जागा मिळवून देऊ, असेआश्वासन दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 14, 2010 09:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close