S M L

वसंत डावखरे बिनविरोध

14 मेविधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे बिनविरोध निवडून आले आहेत. या निवडणुकीकरता डावखरेंच्या विरोधात शिवसेनेने दोन उमेदवार दिले होते. आज दुपारी त्या दोघांनीही आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. यात कल्याण-डोंबिवलीचे महापौर रमेश जाधव यांचा समावेश आहे. डावखरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर हा माघारीचा निर्णय झाला. डावखरे ठाण्यातून चौथ्यांदा विधानपरिषदेवर निवडून आले आहेत. यानिमित्ताने पुन्हा एकदा डावखरे यांना त्यांच्या सर्वपक्षीय सलोख्याने हात दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2010 10:30 AM IST

वसंत डावखरे बिनविरोध

14 मे

विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे बिनविरोध निवडून आले आहेत. या निवडणुकीकरता डावखरेंच्या विरोधात शिवसेनेने दोन उमेदवार दिले होते. आज दुपारी त्या दोघांनीही आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.

यात कल्याण-डोंबिवलीचे महापौर रमेश जाधव यांचा समावेश आहे. डावखरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर हा माघारीचा निर्णय झाला.

डावखरे ठाण्यातून चौथ्यांदा विधानपरिषदेवर निवडून आले आहेत. यानिमित्ताने पुन्हा एकदा डावखरे यांना त्यांच्या सर्वपक्षीय सलोख्याने हात दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 14, 2010 10:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close