S M L

बर्फाच्या हॉटेलमध्ये 'वॉर्म वेलकम'!

Sonali Deshpande | Updated On: Dec 14, 2016 05:03 PM IST

बर्फाच्या हॉटेलमध्ये 'वॉर्म वेलकम'!

ice-hotel-708x400

14 डिसेंबर : सगळीकडे ख्रिसमसचा उत्साह आहे. बर्फाच्या प्रदेशात पर्यटनाचीही धूम आहे. जगभरातल्या पर्यटकांना आकिर्षत करण्यासाठी

फिनलंडमध्ये एक बर्फाचं हॉटेल तयार करण्यात आलंय. उत्तर फिनलंडमधल्या लेव्ही भागात बर्फ कोरून हे हॉटेल तयार करण्यात आलंय. इथल्या नदीकाठावरच्या बर्फाच्या लाद्या आणून हे हॉटेल बांधण्यात आलं.

नॉर्वे, स्वीडन, फिनलंड यासारख्या ध्रुवीय प्रदेशात पर्यटक नॉर्दन लाइट्स पाहण्यासाठी जातात. काही पर्यटकांना अशा थंडगार प्रदेशात राहण्याच्या थराराचा अनुभव घ्यायचा असतो. हे बर्फाचं हॉटेल अशा पर्यटकांसाठी आहे. या हॉटेलच्या आतमध्ये उणे 5 अंश सेल्सियस तापमान आहे.

या थंडगार हॉटेलमध्ये ऊब देणारी ब्लँकेट्स आणि स्लिपिंग बॅग देण्यात येतात. बर्फाच्या हॉटेलला बर्फाची गॅलरीही आहे. हॉटेलच्या गोठलेल्या भिंतींवर वेगवेगळी चित्रं कोरण्यात आलीयत. त्यामुळे हॉटेलमध्ये राहूनच बर्फात राहण्याचा अनुभव तुम्ही घेऊ शकता.

हे हॉटेल बांधण्याचं काम सलग दोन महिने सुरू होतं. आता हे थंडगार हॉटेल पर्यटकांना 'वॉर्म वेलकम' देणार आहे ! हिवाळ्याच्या हंगामात हा दुर्गम भाग पर्यटकांनी गजबजून जाईल. पण नंतर मात्र हे हॉटेल नदीमध्ये वितळून जाईल!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 14, 2016 05:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close