S M L

कोल्हापुरात बहुजन क्रांती मोर्च्याचा एल्गार

Sachin Salve | Updated On: Dec 14, 2016 05:41 PM IST

कोल्हापुरात बहुजन क्रांती मोर्च्याचा एल्गार

14 डिसेंबर : नागपुरात मराठा मोर्चा निघाला असतानाच कोल्हापूरमध्येही बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला होता. कोल्हापूरच्या प्रसिद्ध दसरा चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चाला बहुजन समाजातल्या हजारो बांधवांनी हजेरी लावली होती.

ऍट्रोसिटी कायदा कडक करावा, मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं आणि कोपर्डी घटनेतील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा द्यावी अशा मागण्या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आल्या. मोर्चेक-यांनी त्यांच्या मागण्यांचं निवदेन प्रभारी जिल्हाधिका-यांना देण्यातं आलं. या मोर्चाला कोल्हापूर जिल्ह्यातील असंख्य नागरिकांनी हजेरी लावली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 14, 2016 05:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close