S M L

बीसीसीआयची टीम इंडियाला क्लीन चिट

14 मे20-20 वर्ल्डकपमधील लाजीरवाण्या पराभवानंतर भारतीय टीम आज मुंबईत परतली. रवींद्र जडेजा, आर विनय कुमार, रोहीत शर्मा हे खेळाडू मुंबईत परतले. तर गौतम गंभीर, हरभजन सिंग, सुरेश रैना हे खेळाडू दिल्ली विमानतळावरून घरी परतले. सुपर 8 मध्ये भारतीय टीमला एकही मॅच जिंकता आली नाही. या पराभवानंतर धोणीची कॅप्टन्सी जाईल अशाही बातम्या येत होत्या. पण बीसीसीआयने या बातम्या चुकीच्या असल्याचे म्हटले आहे. तसेच धोणीचे कॅप्टनपदही राहणार असल्याचे सीसीआयकडून समजते. अहवाल सादरटीम व्यवस्थापनाने टी-20 वर्ल्ड कपमधील घडामोडींबाबतचा अहवाल सादर केला आहे. आणि या अहवालामध्ये बीसीसीआयने खेळाडूंना क्लीन चिट दिल्याचे समजते.पण या अहवालात भारतीय बॅटस्‌मन शॉर्ट पिच बॉल खेळताना कमी पडत आहेत, हे मात्र मान्य केले गेले आहे. त्याचसोबत आयपीलमुळे खेळाडूंच्या कामगिरीवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे यात स्पष्ट करण्यात आले आहे. कोणताही खेळाडू अनफिट असल्याची शक्यताही फेटाळण्यात आली आहे. टीमची निवड करताना कोच आणि कॅप्टनला नेहमीच विश्वासात घेत असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच वेस्ट इंडिजमध्ये भारतीय खेळाडूंची क्रिकेट फॅन्ससोबत मारामारी किंवा बाचाबाची झाल्याच्या कोणताही पुरावा नसल्याचे यात स्पष्ट करण्यात आले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2010 11:10 AM IST

बीसीसीआयची टीम इंडियाला क्लीन चिट

14 मे

20-20 वर्ल्डकपमधील लाजीरवाण्या पराभवानंतर भारतीय टीम आज मुंबईत परतली. रवींद्र जडेजा, आर विनय कुमार, रोहीत शर्मा हे खेळाडू मुंबईत परतले. तर गौतम गंभीर, हरभजन सिंग, सुरेश रैना हे खेळाडू दिल्ली विमानतळावरून घरी परतले.

सुपर 8 मध्ये भारतीय टीमला एकही मॅच जिंकता आली नाही. या पराभवानंतर धोणीची कॅप्टन्सी जाईल अशाही बातम्या येत होत्या. पण बीसीसीआयने या बातम्या चुकीच्या असल्याचे म्हटले आहे. तसेच धोणीचे कॅप्टनपदही राहणार असल्याचे सीसीआयकडून समजते.

अहवाल सादर

टीम व्यवस्थापनाने टी-20 वर्ल्ड कपमधील घडामोडींबाबतचा अहवाल सादर केला आहे. आणि या अहवालामध्ये बीसीसीआयने खेळाडूंना क्लीन चिट दिल्याचे समजते.

पण या अहवालात भारतीय बॅटस्‌मन शॉर्ट पिच बॉल खेळताना कमी पडत आहेत, हे मात्र मान्य केले गेले आहे. त्याचसोबत आयपीलमुळे खेळाडूंच्या कामगिरीवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे यात स्पष्ट करण्यात आले आहे.

कोणताही खेळाडू अनफिट असल्याची शक्यताही फेटाळण्यात आली आहे. टीमची निवड करताना कोच आणि कॅप्टनला नेहमीच विश्वासात घेत असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

तसेच वेस्ट इंडिजमध्ये भारतीय खेळाडूंची क्रिकेट फॅन्ससोबत मारामारी किंवा बाचाबाची झाल्याच्या कोणताही पुरावा नसल्याचे यात स्पष्ट करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 14, 2010 11:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close