S M L

नागपूर जिल्हा कोर्टात तलवारीने हल्ला

14 मेनागपूरच्या जिल्हा कोर्टाच्या परिसरात शिराज नावाच्या व्यक्तीवर काही अज्ञात लोकांनी तलवारीने हल्ला केला. यात शिराज जखमी झाला आहे. खुनाचा आरोपी असलेल्या शिराज आज दुपारी कोर्टासमोर हजर होण्यास आला होता. त्यावेळी लपून बसलेल्या काही लोकांनी शिराजवर हल्ला केला. यानंतर हल्लेखोर पळून गेले. जुन्या वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. काही वर्षांआधी याच परिसरात अक्कू यादव नावाच्या गुंडाचा खून करण्यात आला होता. त्यानंतर परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली होती. जखमी शिराजवर मेयो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पोलीस हल्लेखोरांचा तपास करत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 14, 2010 12:32 PM IST

नागपूर जिल्हा कोर्टात तलवारीने हल्ला

14 मे

नागपूरच्या जिल्हा कोर्टाच्या परिसरात शिराज नावाच्या व्यक्तीवर काही अज्ञात लोकांनी तलवारीने हल्ला केला. यात शिराज जखमी झाला आहे.

खुनाचा आरोपी असलेल्या शिराज आज दुपारी कोर्टासमोर हजर होण्यास आला होता. त्यावेळी लपून बसलेल्या काही लोकांनी शिराजवर हल्ला केला. यानंतर हल्लेखोर पळून गेले.

जुन्या वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. काही वर्षांआधी याच परिसरात अक्कू यादव नावाच्या गुंडाचा खून करण्यात आला होता.

त्यानंतर परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली होती. जखमी शिराजवर मेयो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पोलीस हल्लेखोरांचा तपास करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 14, 2010 12:32 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close