S M L

वैद्यनाथ बँकेच्या 10 कोटी नोटा प्रकरणाची सखोल चौकशी करा -धनंजय मुंडे

Sachin Salve | Updated On: Dec 16, 2016 08:19 PM IST

dhanjay_munde316 डिसेंबर : मुंबईतल्या टिळकनगरमध्ये कारमध्ये सापडलेल्या 10 कोटींच्या नोटांच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केलीये.

मुंबईत काल पकडण्यात आले आहे. ही 10 कोटींची रोकड कुणाची आहे याबद्दल तपास सुरू आहे. दरम्यान, 10 कोटी रुपये हे वैद्यनाथ बँकेचे असल्याचा दावा धनंजय मुंडेंनी केलाय.

या बँकेची मुख्य शाखा परळी वैजनाथ, बीड येथे असताना इतकी मोठी रक्कम मुंबईला नेण्याचे कारण काय? बँकेची रक्कम बँकेच्या गाडीतून घेऊन जाण्याऐवजी ती खाजगी गाडीतून घेऊन का नेण्यात आली? एवढी मोठी रक्कम घेऊन जात असताना सुरक्षा रक्षकाची गरज का भासली नाही?, असे प्रश्न मुंडे यांनी उपस्थित केले.

तसंच बँकेत 10 कोटींच्या ठेवी तरी आहेत का असा सवालही मुंडे यांनी उपस्थित केलाय. बँकेचे चेअरमन हे सावकार असल्याचा आरोपही धनंजय मुंडेंनी केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 16, 2016 08:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close