S M L

जमीन लाटली अशी एकही तक्रार नाही, शिंदेंकडून अधिकाऱ्यांची पाठराखण

Sachin Salve | Updated On: Dec 17, 2016 02:28 PM IST

जमीन लाटली अशी एकही तक्रार नाही, शिंदेंकडून अधिकाऱ्यांची पाठराखण

 17 डिसेंबर : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर एकाही अधिकाऱ्याविरोधात पोलीस  स्टेशनमध्ये तक्रार दाखल झालेली नाही असं सांगत एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदेंनी पाठराखण केली. तसंच हा विषय़ महसूल खात्यात येतो त्यामुळे तेच कारवाई करीत असं सांगत चेंडू महसूल खात्याच्या कोर्टात टोलावला.

नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर अधिकाऱ्यांनी जमीन खरेदी केल्या प्रकरणी सभागृहात दाखल करण्यात आलेल्या लक्षवेधीवर आज चर्चा झाली. यावेळी या लक्षवेधीवर एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलं म्हणणं मांडलं. अधिकाऱ्यांची जमीन खरेदी हा महसूल खात्याच्या अखत्यारीतील विषय असल्याने त्याबाबत तेच उचीत कारवाई करतील असं त्यांनी स्पष्ट केलंय. याबाबत मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना केलेली असल्याने त्यामार्फत लवकरात लवकर या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य सगळ्यांसमोर आणू असं आश्वासन शिंदे यांनी सभागृहाला दिलंय.

मात्र या उत्तराने समाधान न झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत जाधव यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणी केलीय. तर नारायण राणेंनीही या प्रकरणावरून सरकारला चांगलंच धारेवर धरलंय. जमिनींच्या सातबारा उताऱ्यांवर अधिकाऱ्यांची नावं असल्याचं त्यांनी अध्यक्षांच्या लक्षात आणून दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 17, 2016 01:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close