S M L

मतदानाच्या आधी येणाऱ्या लक्ष्मीला स्वीकारा -दानवे

Sachin Salve | Updated On: Dec 17, 2016 10:04 PM IST

मतदानाच्या आधी येणाऱ्या लक्ष्मीला स्वीकारा -दानवे

17 डिसेंबर : मतदानाच्या आदल्या दिवशी लक्ष्मी दर्शन होते...जर अशी लक्ष्मी घरी आली तर तिला स्वीकारा, आणि तिचं स्वागत करा असं आवाहनच केलंय भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी..पैठण इथं झालेल्या प्रचारसभेत दानवेंनी हे विधान केलंय.

तिसऱ्या टप्प्यात उद्या रविवारी मतदान होणार आहे. आज पैठण इथं भाजपचे उमेदवार सुरेश लोळगे यांच्या प्रचार सभेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हजर होते. यावेळी भरसभेमध्ये दानवे यांनी मतदानाच्या आदल्यादिवशी येणारी लक्ष्मी स्वीकारा असं आवाहानचं केलंय.  बरं दानवे एवढ्यावर थांबले नाही लक्ष्मी तर स्वीकाराच पण कमळाला मत द्या असंही दानवे म्हणाले. याआधीही दानवे आपल्या वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत सापडले होते. आता पुन्हा एकदा दानवे या विधानामुळे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले दानवे,

"आज 17 तारीख आहे..आणि उद्या 18 ला मतदान आहे. तुम्हा सगळ्यांना घरी जाण्याची घाई झाली आहे. तुम्हाला माहिती असेल निवडणुकीमध्ये मतदानाच्या आदली रात्र महत्वाची असते. कदाचित अचानक पणे लक्ष्मीचं दर्शन होतं असतं. त्यामुळे अशी लक्ष्मी आली तर तिला परत करू नका, तिचं स्वागत करा. पण मतदानाचा निर्धार केलाय तो कायम ठेवा. कमळ या निशाणीला मतदान करा आणि भाजपचे उमेदवार सुरेश लोळगे यांना विजयी करा"

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 17, 2016 09:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close