S M L

विदर्भ आणि मराठवाड्यातील नगरपालिकांच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

Samruddha Bhambure | Updated On: Dec 18, 2016 10:24 AM IST

delhi voting_kejriwal_bedi_makan

18 डिसेंबर :  राज्यात नगरपालिका निवडणुकांचे पहिल्या दोन टप्प्यातील निवडणुका व्यवस्थित पार पडल्यानंतर आज तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. यामध्ये मराठवाडा आणि विधर्भामधील 20 नगरपरिषदा आणि 2 नगरपंचायतीसाठी मतदान होणार आहे.

नांदेड जिल्ह्यातील 9 नगरपालिका आणि 2 नगरपंचायतींसाठी आज मतदान होईल. औरंगाबादमध्येही 4 नगरपालिकांसाठी आज मतदान होणार आहे. भंडारा जिल्ह्यात चार नगरपालिका आणि गडचिरोली जिल्ह्यातील दोन नगरपालिकेच्या निवडणुका आज होणार आहेत. सर्वच ठिकाणी मतदान सुरळीत पार पडावं यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नगरपालिका निवडणुकांमध्ये एकमेकांविरोधात लढत असल्याने नांदेडमधील नगरपालिका निवडणुकीत रंगत येणार आहे. कारण इथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेस दोन हात करत आहे. तर पैठण हा भाजप प्रदेश अध्यक्ष राव साहेब दानवे यांचा मतदार संघ आहे. त्यामुळे पैठणमध्ये दानवे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गंगापूरमध्ये शिवसेनेचं वर्चस्व आहे. मात्र शिवसेना आणि भाजप या ठिकाणी युती आहेत. कन्नड मध्येही आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपले विकास पॅनल उभे केले आहे. तर खुलताबादमध्ये एमआयएमने आपला उमेदवार दिला आहे. त्यात खुलताबाद मध्ये मुस्लिम मतदार अधिक असल्याने तिकडेही राजकीय लक्ष आहे. पहिल्या आणि दुस-या टप्प्यामध्ये भाजपने बाजी मारली असुन आता तिस-या टप्प्यातही भाजप आपली घौडदौड कायम ठेवणार का हे पहावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 18, 2016 08:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close