S M L

काँग्रेसचा हात उंचावला, भाजपचीही सरशी

Sachin Salve | Updated On: Dec 19, 2016 05:03 PM IST

काँग्रेसचा हात उंचावला, भाजपचीही सरशी

19 डिसेंबर : विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरं गेलेल्या काँग्रेसला अखेर स्थानिक निवडणुकीत सूर गवसलाय. नगरपरिषदा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात काँग्रेसचा हात उंचावलाय. दोन्ही टप्प्यात काँग्रेस बॅकफूटवर होती. आता 19 जागांपैकी 19 जागा जाहीर झाल्या असून 8 जागांवर काँग्रेसने विजय मिळवलाय. तर त्यापाठोपाठ भाजपने दुसऱ्या जागा पटकावली असून 8 जागा जिंकल्या आहे.

नगरपरिषदा निवडणुकीत दोन्ही टप्प्यात नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत भाजपने बाजी मारलीये. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात भाजप सर्वाधिक जागा जिंकत अव्वल राहिलं. तिसऱ्या टप्पातऔरंगाबाद,नांदेड,भंडारा आणि गडचिरोलीमध्ये  एकूण 19 नगरपरिषदांसाठी मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीपासून काँग्रेसने आघाडी घेतली ती अजूनही कायम आहे. काँग्रेसचे 5 ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नांदेडमध्ये अर्धापूर, बिलोली नगर परिषदेत काँग्रेसने बाजी मारलीये.  एकूण चार ठिकाणी काँग्रेसने सत्ता काबीज केलीये.

दरम्यान, मुदखेडमध्ये अशोक चव्हाणांना धक्का बसलाय. काँग्रेसचे 10 नगरसेवक विजयी झाले पण नगराध्यक्षपद अपक्ष उमेदवाराकडे गेलंय. तर उमरीमध्ये राष्ट्रवादीने 17 पैकी 17 जागा जिंकत आपली सत्ता कायम राखली आहे. तर गडचिरोलीतही भाजपने खातं उघडलं असून  25 जागा पैकी 18 जागा पटकावल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 19, 2016 04:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close