S M L

दानवेंनी ज्या उमेदवाराच्या सभेत लक्ष्मी स्वीकारा सांगितलं 'तो' उमेदवार विजयी

Sachin Salve | Updated On: Dec 19, 2016 02:27 PM IST

दानवेंनी ज्या उमेदवाराच्या सभेत लक्ष्मी स्वीकारा सांगितलं 'तो' उमेदवार विजयी

19 डिसेंबर :  मतदानाच्या आदल्यादिवशी घरी आलेली लक्ष्मी स्वीकारा तिचं स्वागत करा असं वादग्रस्त विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलं होतं. आणि हे विधान ज्यांच्यासाठी अर्थात ज्या उमेदवाराच्या सभेत  केलं होतं ते भाजपचे उमेदवार सुरेश लोळगे विजयी झाले असून त्यांच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ पडलीये.

नगरापरिषदेच्या तिसऱ्या टप्प्यात मतमोजणी सुरू असून हळूहळू सर्व कौल हाती येत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालावरुन काँग्रेसचे दमदार आघाडी घेतलीये . भाजपचीही विजयी घोडदौड कायम आहे. पैठणमध्ये मागच्या शनिवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुरेश लोळगे यांच्यासाठी प्रचार सभा घेतली होती. या सभेत दानवे म्हणाले होते की, मतदानाच्या आदल्यादिवशी लक्ष्मीदर्शन होईल, जर घरी लक्ष्मी आली तर स्वीकारा आणि तिचं स्वागत करा. मतदानाचा जो काही निर्धार केलाय तो करा पण सुरेश लोळगे यांना विजयी करा असं आवाहन दानवेंनी केलं होतं.

आज मतमोजणीअंती पैठणमध्ये शिवसेनेनं सर्वाधिक 7 जागा जिंकल्या आहे. तर भाजपचे 5 उमेदवार विजयी झाले आहे. तर काँग्रेसने 4 जागा पटकावल्या आहे. नगराध्यक्षपदी सुरेश लोळगेंची निवड झालीये. विशेष म्हणजे सुरेश लोळगे हे अवघ्या 24 वर्षांचे तरुण नगराध्यक्ष म्हणून समोर आले आहे. त्यांच्या या विजयाबद्दल पैठणमध्ये एकच जल्लोष करण्यात आलाय.

पैठण एकूण जागा 23

शिवसेना - 7, भाजप 5, राष्ट्रवादी 6, काँग्रेस 4 अपक्ष 1

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 19, 2016 02:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close