S M L

करूण नायर नावाचं वादळ, झळकावली ट्रिपल सेंच्युरी

Sachin Salve | Updated On: Dec 19, 2016 07:37 PM IST

करूण नायर नावाचं वादळ, झळकावली ट्रिपल सेंच्युरी

19 डिसेंबर :  तो आला त्याने पाहिलं आणि त्याने जिंकलं...असंच करुण नायरबद्दल म्हणावं लागेल. इंग्लंडविरुद्ध करुण नायरने तडाखेबाज फलंदाजी करत ट्रिपल सेंच्युरी झळकावली आहे. 300 रन्सचा टप्पा गाठत भारतात मजबूत आघाडी मिळवून दिलीये. तब्बल 32 चौकर आणि  4 षटकारांचा यात समावेश आहे. करुण नायर नावाने भारतीय किक्रेटच्या इतिहासात आणखी एक रेकॅार्ड नोंदवला गेलाय.

पाचव्या कसोटीमध्ये चौथ्या दिवशी भारताने इंग्लंडच्याविरुद्ध 7 गडी बाद 759 धावांवर डाव घोषित केलाय.  भारताने तब्बल 282 धावांची आघाडी घेतलीये. करुण नायरने झुंझार खेळी करत ट्रिपल सेंच्युरी झळकावलीये. नायरने सचिन तेंडुलकरचा 248 धावांचा रेकॅार्ड मोडित काढलाय. या रेकॅार्डसह 250 रन्स बनवणारा तो चौथा भारतीय खेळाडू ठरलाय. या आधी विरेंद्र सेहवागने 329 धावांचा रेकॅार्ड रचलाय. व्हीव्हीएस लक्ष्मण 281 आणि राहुल द्रविड 270 धावांचा रेकॅार्ड आहे. आता या पंक्तीत करुण नायरचं नाव जोडलं गेलं असून तो दुसरा भारतीय खेळाडू ठरलाय. विशेष म्हणजे मधल्या फळीत उतरून करुण नायरने ही चमकदार कामगिरी करून दाखवलीये. त्याआधी लोकेश राहुलने शानदार 199 धावांची खेळी केलीये. पण दुर्दैवाने 1 धावेमुळे त्यांचं द्विशतक हुकलंय. तर पार्थिव पटेलनंही शानदार अर्धशतक झळकावत आपली चुणून दाखवलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 19, 2016 04:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close