S M L

झोपडपट्टी मृत्यू प्रकरणी रिलायन्सवर गुन्हा दाखल

15 मेमानखुर्द येथील झोपडपट्टी पाडताना एक युवक मृत्यूमुखी पडल्या प्रकरणी रिलायन्स कंपनी आणि संबधित अधिकार्‍यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 304 नुसार मानखुर्द पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे. मानखुर्दमधील अण्णाभाऊ साठे नगरातील झोपडपट्‌ट्या पाडण्याच्या कारवाईदरम्यान एका 25 वर्षांच्या तरुणाचा वीजेचा धक्का बसून मृत्यू झाला. शिवा भुतेकर असे या मृत तरुणाचे नाव आहे. या कारवाईदरम्यान रिलायन्सने वीज खंडित केली नसल्याने, तरुणाला वीजेचा धक्का बसला होता. या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत मानखुर्द पोलीस स्टेशनवर झोपडपट्टीवासीयांनी मोर्चा नेला होता. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले होते. अखेर या प्रकरणी रिलायन्स एनर्जी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 15, 2010 02:32 PM IST

झोपडपट्टी मृत्यू प्रकरणी रिलायन्सवर गुन्हा दाखल

15 मे

मानखुर्द येथील झोपडपट्टी पाडताना एक युवक मृत्यूमुखी पडल्या प्रकरणी रिलायन्स कंपनी आणि संबधित अधिकार्‍यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कलम 304 नुसार मानखुर्द पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे.

मानखुर्दमधील अण्णाभाऊ साठे नगरातील झोपडपट्‌ट्या पाडण्याच्या कारवाईदरम्यान एका 25 वर्षांच्या तरुणाचा वीजेचा धक्का बसून मृत्यू झाला. शिवा भुतेकर असे या मृत तरुणाचे नाव आहे.

या कारवाईदरम्यान रिलायन्सने वीज खंडित केली नसल्याने, तरुणाला वीजेचा धक्का बसला होता.

या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत मानखुर्द पोलीस स्टेशनवर झोपडपट्टीवासीयांनी मोर्चा नेला होता.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले होते. अखेर या प्रकरणी रिलायन्स एनर्जी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 15, 2010 02:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close