S M L

बदलापुरात 2000 आणि 500 च्या नोटा जप्त,एकाला अटक

Sachin Salve | Updated On: Dec 19, 2016 09:47 PM IST

बदलापुरात  2000 आणि 500 च्या नोटा जप्त,एकाला अटक

19 डिसेंबर : नोटबंदीनंतर चलनात आलेल्या २००० आणि ५०० रुपयांच्या नवीन बनावट नोटा  बदलापूर पूर्व पोलिसांनी  जप्त केल्या आहेत. या बनावट नोटा बाळगणाऱ्या अजय पुजारी पोलिसांनी अटक केली आहे. 2000ची एक तर 500च्या 9 नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहे.

बदलापूर परिसरात यात्री हॉटेल येथे आरोपी अजय हा २००० आणि ५०० नवीन बनवट घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे  पोलीस निरीक्षक गौतम कांबळे यांना खबऱ्याने दिली होती. त्यानुसार कांबळे यांच्या पथकाने सापळा रचला. यावेळी आरोपी अजय हा यात्री हॉटेल जवळ आला असता पोलिसांना त्याच्या हालचाली या संशयास्पद वाटल्याने त्यांनी त्याची झडती घेतली.

त्यात त्यांना त्याच्याजवळ २००० आणि ५०० नवीन बनावट नोटा सापडल्या. पोलिसांनी त्या जप्त करून अजय पुजारी याला केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता २१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. मात्र आरोपीकडून या बनावट नोटा कुठून आल्या आणि यात आणखी कोण सहभागी असे याचा पोलीस शोध घेत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 19, 2016 09:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close