S M L

बीडमध्ये वाळू उपशाचे 4 बळी

16 मे राज्यात सगळीकडे वाळू माफियांनी धुमाकूळ घातला आहे. या माफियांनी वाळूतून मिळणा-या पैशांसाठी खूनही पाडले आहेत. या वाळूउपशानेच आज अक्षयतृतीयेच्या दिवशी बीडमधील हिंगणगाव गावावर शोककळा पसरवली. वाळू उपशातून गोदावरी नदीच्या पात्रात पडलेल्या खड्ड्यामध्ये बुडून ४ चिमुकल्यांनी जीव गमावला. पोहण्यासाठी गेलेल्या कोमल सदाफुले (वय 4) राणी कैलास दाभाडे (वय 8) कालिंदा भास्कर दाभाडे (वय 6) आणि आदित्य मनोहर सदाफुले (वय 6) या कोवळ्या जीवांना प्राण गमवावे लागले. यावेळी उषा दाभाडे ही सहा वर्षांची चिमुकली सुदैवाने बचावली. याआधीही वाळू उपशावरून बीड जिल्ह्यात खून पडल्याची उदाहरणे आहेत. वाळू उपसा किती करावा, त्यासाठी नदीपात्रात किती मोठे खड्डे करावेत यासंबंधीचे काही नियम आहेत. पण वाळू माफिया हे सगळे नियम धाब्यावर बसवताना दिसतात. त्यामुळेच अशा घटना घडत असल्याचे गावक-यांचे म्हणणे आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 16, 2010 05:49 AM IST

बीडमध्ये वाळू उपशाचे 4 बळी

16 मे

राज्यात सगळीकडे वाळू माफियांनी धुमाकूळ घातला आहे. या माफियांनी वाळूतून मिळणा-या पैशांसाठी खूनही पाडले आहेत. या वाळूउपशानेच आज अक्षयतृतीयेच्या दिवशी बीडमधील हिंगणगाव गावावर शोककळा पसरवली.

वाळू उपशातून गोदावरी नदीच्या पात्रात पडलेल्या खड्ड्यामध्ये बुडून ४ चिमुकल्यांनी जीव गमावला.

पोहण्यासाठी गेलेल्या कोमल सदाफुले (वय 4) राणी कैलास दाभाडे (वय 8) कालिंदा भास्कर दाभाडे (वय 6) आणि आदित्य मनोहर सदाफुले (वय 6) या कोवळ्या जीवांना प्राण गमवावे लागले.

यावेळी उषा दाभाडे ही सहा वर्षांची चिमुकली सुदैवाने बचावली.

याआधीही वाळू उपशावरून बीड जिल्ह्यात खून पडल्याची उदाहरणे आहेत.

वाळू उपसा किती करावा, त्यासाठी नदीपात्रात किती मोठे खड्डे करावेत यासंबंधीचे काही नियम आहेत. पण वाळू माफिया हे सगळे नियम धाब्यावर बसवताना दिसतात. त्यामुळेच अशा घटना घडत असल्याचे गावक-यांचे म्हणणे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 16, 2010 05:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close