S M L

भारताचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय, मालिकाही जिंकली

Sachin Salve | Updated On: Dec 20, 2016 07:08 PM IST

भारताचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय, मालिकाही जिंकली

20 डिसेंबर :  करुण नायरच्या त्रिशतकी खेळी आणि रवींद्र जडेजाच्या भेदक माऱ्यापुढे गोऱ्या साहेबांचा फज्जा उडालाय. पाचव्या टेस्टमध्ये भारताने इंग्लंडला 75 रन्स आणि 1 डावाने पराभूत करून मालिका खिश्यात घातलीये.

चेन्नईमध्ये पाचव्या टेस्टमध्ये इंग्लंडविरुद्ध भारताने धावांचा डोंगर उभा केला होता. भारताने दुसरा डाव 759 रन्सवर घोषीत केला होता. इंग्लंड पहिल्या डावात 282 रन्सने पिछाडीवर असल्यामुळे सावध सुरुवात केली. पण कॅप्टन एलिस्टर कुक आणि कीटन जेनिंग्सने पहिल्या विकेटसाठी 103 रन्सची भागिदारी केली. पण त्यानंतर 49 रन्सवर कुकला जडेजाने पव्हेलियन्सचा रस्ता दाखवला. कुकच्या आऊट झाल्यानंतर जेनिंग्सही 54 रन्सवर आऊट झाला. त्यानंतर रवींद्र जडेजाच्या माऱ्यापुढे इंग्लंड टीम टीकू शकली नाही. 196 रन्सवर 7 विकेट अशी दारुण अवस्था इंग्लंडची झाली. अखेर 207 रन्सवर इंग्लंडची टीम अॅालाऊट झाली.  भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक 8 विकेट घेतल्या. तर ईशांत शर्मा, उमेश यादव आणि अमित मिश्राने प्रत्येकी एक-एक विकेट घेतल्या.

भारताने 2008 नंतर पहिल्यांदा इंग्लंडला कसोटी मालिकेमध्ये पराभूत केलंय. तर विराट कोहलीच्या कॅप्टन कारकिर्दीत सलग 5 वी मालिका जिंकली आहे.  विशेष म्हणजे टीम इंडियाने 84 वर्षांनंतर सलग 5 वी मालिका जिंकली आहेत. 2015 मध्ये श्रीलंकाला 2-0 आणि दक्षिण आफ्रिकेला 3-0 ने पराभूत केलं होतं. तर 2016 मध्ये वेस्टइंडिज 2-0, न्यूझीलंड 3-0 आणि इंग्लंडच्या विरुद्ध 4-0 अशी विजयाची नोंद केलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 20, 2016 04:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close