S M L

बीडमध्ये आरक्षणासाठी मुस्लीम समाजाचा मोर्चा

Sachin Salve | Updated On: Dec 20, 2016 06:37 PM IST

बीडमध्ये आरक्षणासाठी मुस्लीम समाजाचा मोर्चा

20 डिसेंबर  : मुस्लीम समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आज बीडमध्ये महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुस्लीम बांधव सहभागी झाले होते.

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी जिल्हा क्रीडा संकुलातून या मोर्च्याला सुरुवात झाली.  मुस्लीम समाजाला 5 टक्के आरक्षण मिळावं, मुस्लीम समाजाच्या कायद्यांमध्ये केंद्र सरकारने कोणतीही ढवळाढवळ करू नये आणि मुस्लीम समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी शासनाने प्रयत्न करावेत अशा मागण्या या मोर्चाच्या निमित्ताने करण्यात आल्या. मुस्लीम समाजातील मुलींनी या मोर्चाचं नेतृत्त्व केलं. तर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या मोर्चाची सांगता झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 20, 2016 06:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close