S M L

उल्हासनगर महापालिकेला आयकर विभागाची नोटीस

Sachin Salve | Updated On: Dec 20, 2016 07:47 PM IST

उल्हासनगर महापालिकेला आयकर विभागाची नोटीस

20 डिसेंबर : उल्हासनगर महापालिकेला आयकर विभागाने नोटीस पाठवलीय. नोटाबंदीच्या काळात 50 हजार रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता कर भरणाऱ्यांची यादी पाठवण्याच्या सुचना नोटीसीद्वारे करण्यात आलंय.

8 नोव्हेंबरला हजार  आणि 500 च्या नोटाव्यवहारातून सरकारने बाद केल्या. त्यानंतर बँक, रेल्वे, एयरपोर्ट, पेट्रोल पंप आणि महापालिका, नगरपालिका इथं सरकारने मुभा दिली. त्यामुळे महापालिका आणि नगर पालिकांमध्ये जुन्या बेहिशोबी नोटा निकालात काढण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. उल्हासनगर महापालिकेत सुमारे 40 कोटी रूपये या काळात जमा झाले. आता आयकर विभागाने बँक खात्यासोबत हे खातं तपासण्यास सुरुवात केलीय. त्यामुळे एकच खळबळ उडालीय. महापालिकेने 712 मालमत्ता धारकांची यादी आयकर विभागला सुपूर्द केल्याचं आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 20, 2016 07:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close