S M L

शिवस्मारकाच्या भूमिपूजनाला सेना उपव्यासपीठावर ?

Sachin Salve | Updated On: Dec 20, 2016 10:59 PM IST

 शिवस्मारकाच्या भूमिपूजनाला सेना उपव्यासपीठावर ?

20 डिसेंबर :  शिवस्मारकाच्या भूमिपूजनाच्या मुख्य व्यासपीठावर भाजपचं असणार आहे. तर विशेष निमंत्रितांसाठी इतर व्यासपीठ उभारलं जाणार आहे. आयबीएन लोकमतशी बोलतांना शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी ही माहिती दिली. त्यामुळे भाजपच शिवस्मारक भूमिपूजन कार्यक्रम हायजॅक करणार असं चित्र आहे.

छत्रपती शिवाजी महाराजाच्या नियोजित अरबी समुद्रातील स्मारकाचा भूमिपूजन सोहळा दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र, शिवसेना आणि भाजपमध्ये भूमिपूजनावरुन मानपपानाचे नाट्य रंगले आहे. उद्धव ठाकरे यांना व्यासपीठावर बोलावच असा आग्रह सेनेनं धरलाय तर प्रोटोकॅाल पुढे करत भाजपने सेनेची मागणी नाकारली आहे. मुख्य व्यासपीठावर फक्त पंतप्रधानांसह भाजपचे मंत्री बसतील असं भाजपने स्पष्ट केलंय. तर निमंत्रितांसाठी उपव्यासपीठ असणार असल्यांचं सांगत सेनेला बाजूला सारलंय. उद्धव ठाकरे हे एका पक्षाचे प्रमुख असल्यामुळे त्यांना मुख्यव्यासपीठावर स्थान देणे प्रोटोकॅालनुसार याआधीही शक्य झालं नाही. त्यामुळे यावेळी वाद टाळण्यासाठी भाजपने उपव्यासपीठाचा पर्याय पुढे केलाय.

मात्र, सेना आपला मागणीवर ठाम आहे.  त्यामुळे उद्धव ठाकरे यांनीही सन्मानं बोलावलं तरच भूमिपूजनाला येणार असं स्पष्ट केलंय. तसंच शिवस्मारक होणं महत्वाचं आहे ही चांगली गोष्ट आहे. पण त्याचबरोबर कोळी बांधवांचेही प्रश्न महत्वाचे आहेत. त्यांना याबाबत विश्वासात घेतलं पाहिजे असं सूचक वक्तव्यही उद्धव ठाकरेंनी केलं. तर दुसरीकडे आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीतर भूमिपूजनाचा कार्यक्रम उधळून लावू असा इशारा महाराष्ट्र मच्छिमार संघटनेचे दामोदर तांडेले यांनी दिलाय. त्यामुळे सेनेची नाराजी भाजप ओढावून घेणार की मनधरणी करणार हे पाहण्याचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 20, 2016 10:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close