S M L

चिक्की घोटाळ्याप्रकरणी पंकजा मुंडेंना एसीबीकडून क्लीनचिट

Samruddha Bhambure | Updated On: Dec 21, 2016 03:02 PM IST

चिक्की घोटाळ्याप्रकरणी पंकजा मुंडेंना एसीबीकडून क्लीनचिट

Pankaja munde banner1

21 डिसेंबर : चिक्की घोटाळ्याप्रकरणी राज्याच्या महिला कल्याण आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांना क्लीनचिट मिळाली आहे. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या संदर्भातील फाइल बंद केली आहे. याबाबतचा अहवाल गृहविभागाला पाठवण्यात आला आहे.

पंकजा मुंडेंनी अधिकारांचा वापर करुन अंगणवाडीसाठीच्या वस्तूंसाठी नियम धाब्यावर बसवले. एकाच दिवशी अनेक जीआर काढून 206 कोटींच्या वस्तूंसाठी 24 कंत्राटं दिली, असा गंभीर आरोप पंकजा मुंडेंवर करण्यात आला होता.   या घोटाळ्या प्रकरणाची चौकशी सुरू होती. याप्रकरणी पंकजा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत विरोधकांनी अधिवेशनादरम्यान गदारोळ माजवला होता. मात्र एसीबीने क्लीनचिट देताना एका दिवसात किती कंत्राटं द्यायची याचा पूर्ण अधिकार संबंधित मंत्री आणि खात्याचा असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 21, 2016 01:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close