S M L

तारापूर एमआयडीसीतील आग आटोक्यात

17 मेतारापूर औद्योगिक वसाहतीमधील स्टर्लिंग केमिकल्स कंपनीला लागलेली आग आटोक्यात आली आहे. रात्री लागलेल्या भीषण आगीत ही कंपनी पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फायर ब्रिगेडचे 5 बंब 10 तास प्रयत्न करत होते. या आगीत संपूर्ण कारखाना, इमारत आणि स्टोअरेज एरिया तसेच कंपनीजवळ उभी असलेली दोन वाहने जळून खाक झाली.सानपाड्यात आगसानपाड्यातल्या मिलेनियम टॉवर्स वसाहतीत आज सकाळी आग लागली. या कॉम्प्लेक्समधल्या ए-6 बिल्डिंगच्या सहाव्या मजल्यावर ही आग लागली. ही आग शेजारच्या घरातही पसरली. आग लागली तेव्हा या घरामध्ये कोणीही नव्हते. आग लागल्यानंतर ही बिल्डिंग रिकामी करण्यात आली होती. आता ही आग विझवण्यात आली आहे. पुण्यात फायर बॉल निकामी पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या कारणाने आगी लागल्या. या आगींमध्ये कोट्यवधींचे नुकसान झाले. अशा प्रकारच्या आगी रोखण्यासाठी पुणे महानगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून फायर बॉलची व्यवस्था केली होती. पण लाखो रुपये खर्च करुन बसवण्यात आलेले हे फायर बॉल पूर्णपणे निकामी झाल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारात उघडकीस आली आहे.आग लागल्यावर ताबडतोब पाणी उपलब्ध व्हावे, म्हणून या फायर बॉलची व्यवस्था करण्यात आली होती. हे फायर बॉल शहरातील मुख्य पाण्याच्या लाईनला जोडले होते. अशा प्रकारे 2 हजार 994 फायर बॉल बसवण्यात आले. पण याचा काहीही उपयोग झाला नसल्याचे फायर ब्रिगेडच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: May 17, 2010 11:33 AM IST

तारापूर एमआयडीसीतील आग आटोक्यात

17 मे

तारापूर औद्योगिक वसाहतीमधील स्टर्लिंग केमिकल्स कंपनीला लागलेली आग आटोक्यात आली आहे.

रात्री लागलेल्या भीषण आगीत ही कंपनी पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही.

या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फायर ब्रिगेडचे 5 बंब 10 तास प्रयत्न करत होते. या आगीत संपूर्ण कारखाना, इमारत आणि स्टोअरेज एरिया तसेच कंपनीजवळ उभी असलेली दोन वाहने जळून खाक झाली.

सानपाड्यात आग

सानपाड्यातल्या मिलेनियम टॉवर्स वसाहतीत आज सकाळी आग लागली.

या कॉम्प्लेक्समधल्या ए-6 बिल्डिंगच्या सहाव्या मजल्यावर ही आग लागली. ही आग शेजारच्या घरातही पसरली.

आग लागली तेव्हा या घरामध्ये कोणीही नव्हते. आग लागल्यानंतर ही बिल्डिंग रिकामी करण्यात आली होती. आता ही आग विझवण्यात आली आहे.

पुण्यात फायर बॉल निकामी

पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या कारणाने आगी लागल्या. या आगींमध्ये कोट्यवधींचे नुकसान झाले.

अशा प्रकारच्या आगी रोखण्यासाठी पुणे महानगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून फायर बॉलची व्यवस्था केली होती. पण लाखो रुपये खर्च करुन बसवण्यात आलेले हे फायर बॉल पूर्णपणे निकामी झाल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारात उघडकीस आली आहे.

आग लागल्यावर ताबडतोब पाणी उपलब्ध व्हावे, म्हणून या फायर बॉलची व्यवस्था करण्यात आली होती. हे फायर बॉल शहरातील मुख्य पाण्याच्या लाईनला जोडले होते.

अशा प्रकारे 2 हजार 994 फायर बॉल बसवण्यात आले. पण याचा काहीही उपयोग झाला नसल्याचे फायर ब्रिगेडच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 17, 2010 11:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close