S M L

ठाण्यात 27 कोटी किंमतीचं युरेनियम जप्त

Sachin Salve | Updated On: Dec 21, 2016 07:26 PM IST

ठाण्यात 27 कोटी किंमतीचं युरेनियम जप्त

21 डिसेंबर :  ठाण्यामध्ये तब्बल 27 कोटी किंमतीचं युरेनियम जप्त करण्यात आलंय. ठाणे गुन्हे शाखेनं घोडबंदर रोडवर आठ किलो ८६१ ग्राम बहुमूल्य युरेनियम जप्त केलंय. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून  भाभा एटॉमिक रिसर्च सेंटरकडून या युरेनियमचे माहिती घेण्यात आली असून हे युरेनियमचा असल्याचं उघड झाले आहे.

हे युरेनियम भारताबाहेरच्या असल्याचे तपासात उघड झाले असून या युरेनियम मागे कोणाचा काय हेतू होता याचा तपास आता ठाणे गुन्हे शाखा घेत आहे. युरेनियम हा अतिसंवेदनशील धातू असून त्याचा वापर हा संवेदनशील आहे. देशविघातक तत्वांचा हात या प्रकारात आहे का याचा देखील तपस घेतला जात आहे. ठाणे गुन्हे शाखेनं दोन आरोपीना ताब्यात घेतले असून युरेनियम एनर्जी कायद्यानुसार याचा गुन्हा दाखल होणार असून साधारण गुन्ह्यांपेक्षा हा गुन्हा हा वेगळा आहे. या प्रकारात आणखी तपास होणे आवश्यक असून त्यासाठी गुन्हे शाखा तपास करत असल्याचं ठाणे पोलिसांनी सांगितलं आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 21, 2016 07:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close