S M L

'तैमूर'वरच्या चर्चांना ऋषी कपूरचे खडे बोल

Sonali Deshpande | Updated On: Dec 22, 2016 10:38 AM IST

'तैमूर'वरच्या चर्चांना ऋषी कपूरचे खडे बोल

22डिसेंबर: करिना-सैफच्या मुलाच्या तैमूर नावाची उलटसुलट चर्चा दोन दिवस सुरू आहे. आता यात उडी घेतलीय करिनाचे काका आणि तैमूरचे आजोबा ऋषी कपूर यांनी. त्यांनी तैमूर नावावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं.

वेगवेगळी ट्विट्स करण्यात ऋषी कपूर यांचा हातखंडा आहे. तैमूर या नावाबद्दल ऋषी कपूर म्हणतात, 'आई-वडील आपल्या मुलाचं नाव काहीही ठेवतील. लोकांना काय त्रास होतो?'

  अजून एका ट्विटमध्ये ते म्हणतात, 'तुम्ही तुमचं काम करा. तुमच्या मुलाचं तर नाव नाही ना ठेवलं?' तैमूर राजा किती दुष्ट होता, अशा ट्विट्सनाही त्यांनी उत्तर दिलंय. ते म्हणाले, 'अॅलेक्झांडर आणि सिकंदरही काही संत नव्हते.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 22, 2016 09:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close