S M L

संजय दत्त-सलमानमध्ये वितुष्ट?

Sonali Deshpande | Updated On: Dec 22, 2016 01:58 PM IST

संजय दत्त-सलमानमध्ये वितुष्ट?

22 डिसेंबर: बाॅलिवूडचा दबंग खान आणि संजय दत्त चांगले मित्र समजले जायचे. पण आता दोन मित्रांमध्ये दरी निर्माण झाल्याचं दिसतंय. संजय दत्तनं सलमानला म्हटलंय 'घमंडी'.

संजय दत्त तुरुंगातून सुटल्यावर सलमान पार्टी देणार असं म्हणाला होता. पण संजय बाहेर आल्यावरही तो त्याला भेटायला गेला नाही. आता एका इव्हेंटमध्ये एक गेम शो चालला होता. त्यात एखाद्या व्यक्तीचं नाव ऐकल्यावर पहिला शब्द काय मनात येतो, असं विचारलं होतं. संजय दत्तला या गेममध्ये नाव दिलं सलमानचं. तेव्हा तो पटकन म्हणाला 'घमंडी'. संजयनं सल्लूमियाँला गर्विष्ठ का म्हटलंय याचं सगळ्यांना आश्चर्य वाटतंय.

दोघांच्या मैत्रीमध्ये दरी पडल्याची चर्चा लगेच रंगायला लागली. खरं काय, खोटं काय हे ते दोघंच सांगू शकतील. पण संजय दत्तचं उत्तरामुळे कुछ तो गडबड है असंच वाटतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 22, 2016 01:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close