S M L

'दंगल' टॅक्स फ्री करा-आमिर खान

Sonali Deshpande | Updated On: Dec 22, 2016 02:16 PM IST

'दंगल' टॅक्स फ्री करा-आमिर खान

22डिसेंबर: उद्या बहुचर्चित दंगल रिलीज होतोय.आमिर खाननं थिएटर्स मालकांना सिनेमाच्या तिकिटांची किंमत वाढवू नका असं सांगितलंय. याशिवाय सिनेमा टॅक्स फ्री करायची विनंतीही 12 राज्यांना केलीय.

कुठलाही मोठा सिनेमा रिलीज होतो, तेव्हा अनेक थिएटर्समध्ये तिकिटांचा दर नेहमीपेक्षा जास्त ठेवला जातो. पण तसं करू नका अशी विनंती आमिरनं केलीय. आमिर म्हणतो, 'हा सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्य़ंत पोचावा असं मला वाटतंय. सिनेमा टॅक्स फ्री घोषित झाला तर जास्तच बरं. आम्ही 12 राज्यांना तशी विनंती केलीय.'

कुस्तिवीर महावीर फोगट यांच्या आयुष्यावर हा सिनेमा आहे. आमिरनं त्यात महावीर फोगट यांची भूमिका केलीय. फोगट यांनी गीता आणि बबिता फोगट यांना कसं घडवलं यावर सिनेमात झोत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 22, 2016 02:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close