S M L

पोलीस अधिकार्‍यांच्या नेमणुकीबाबत आक्षेप

17 मेमाजी पोलीस महासंचालक जे. एफ. रिबेरो यांनी पोलीस दलातील काही पोलिस अधिकार्‍यांच्या नेमणुकांविषयी आक्षेप घेतले आहेत.राज्यात चांगले पोलीस अधिकारी नाहीत, असे नाही. पण त्यांना चांगल्या जागी नेमणुका देण्याची गरज आहे. इन्स्पेक्टरपासूनच्या बदल्या जर मंत्रालयातून होणार असतील, तर बदली झालेले अधिकारी वरिष्ठांच्या सूचना कशा ऐकतील? असा सवाल माजी पोलीस महासंचालक जे. एफ. रिबेरो यांनी केला आहे. झोन 11 चे डिसीपी संजय बॅनर्जी, झोन 12 चे डिसीपी अजित पाटील, रामराव पवार आणि गुन्हे शाखेचे पोलीस सहआयुक्त हिमांशु रॉय या चार अधिकार्‍यांबद्दल रिबेरो यांनी थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे लेखी तक्रार केली आहे. पब्लिक कन्सर्न फॉर गव्हर्नन्स ट्रस्ट या संस्थेतर्फे त्यांनी हे पत्र लिहले आहे. हे अधिकारी सहकारी अधिकार्‍यांवर दबाव टाकतात. त्यामुळे त्या पदावर काम करण्यास ते योग्य नाहीत. त्यांच्या वर्तनामुळे हाताखालचे कर्मचारी अधिकारी त्रस्त आहेत. भ्रष्ट अधिकारी असे या अधिकार्‍यांचे रेप्युटेशन आहे, असेही रिबेरो यांनी पत्रात म्हटलेआहे. रिबेरो यांनी माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती मागितली होती. प्रत्येक बदलीमध्ये राजकीय हस्तक्षेप करणार असेल तर घडणार्‍या घटनांना राजकारणीच जबाबदार राहतील, असेही रिबेरो म्हणालेत.

आईबीएन लोकमत | Updated On: May 17, 2010 02:37 PM IST

पोलीस अधिकार्‍यांच्या नेमणुकीबाबत आक्षेप

17 मे

माजी पोलीस महासंचालक जे. एफ. रिबेरो यांनी पोलीस दलातील काही पोलिस अधिकार्‍यांच्या नेमणुकांविषयी आक्षेप घेतले आहेत.

राज्यात चांगले पोलीस अधिकारी नाहीत, असे नाही. पण त्यांना चांगल्या जागी नेमणुका देण्याची गरज आहे. इन्स्पेक्टरपासूनच्या बदल्या जर मंत्रालयातून होणार असतील, तर बदली झालेले अधिकारी वरिष्ठांच्या सूचना कशा ऐकतील? असा सवाल माजी पोलीस महासंचालक जे. एफ. रिबेरो यांनी केला आहे.

झोन 11 चे डिसीपी संजय बॅनर्जी, झोन 12 चे डिसीपी अजित पाटील, रामराव पवार आणि गुन्हे शाखेचे पोलीस सहआयुक्त हिमांशु रॉय या चार अधिकार्‍यांबद्दल रिबेरो यांनी थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे लेखी तक्रार केली आहे.

पब्लिक कन्सर्न फॉर गव्हर्नन्स ट्रस्ट या संस्थेतर्फे त्यांनी हे पत्र लिहले आहे. हे अधिकारी सहकारी अधिकार्‍यांवर दबाव टाकतात. त्यामुळे त्या पदावर काम करण्यास ते योग्य नाहीत. त्यांच्या वर्तनामुळे हाताखालचे कर्मचारी अधिकारी त्रस्त आहेत. भ्रष्ट अधिकारी असे या अधिकार्‍यांचे रेप्युटेशन आहे, असेही रिबेरो यांनी पत्रात म्हटलेआहे.

रिबेरो यांनी माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती मागितली होती. प्रत्येक बदलीमध्ये राजकीय हस्तक्षेप करणार असेल तर घडणार्‍या घटनांना राजकारणीच जबाबदार राहतील, असेही रिबेरो म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 17, 2010 02:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close