S M L

इंग्लडनं अपयश काढलं धुवून

अमित बोस17 मेक्रिकेटचा जन्म हा इंग्लंडमध्ये झाला... पण इंग्लंड टीमला आतापर्यंत वर्ल्ड कप विजेतेपदाने हुलकावणीच दिली होती... 1979, 1987 आणि 1992 मध्ये इंग्लिश टीमने वर्ल्ड कप फायनलमध्ये धडक मारली खरी... पण विजेतेपदाचा ताज हा काही इंग्लंडच्या डोक्यावर चढला नाही... पण रविवारी वेस्ट इंडिजमध्ये गेल्या चार दशकांचं हे अपयश धुवून निघालं... ऑस्ट्रेलियावर दणक्यात मात करत पॉल कॉलिंगवूडच्या इंग्लंड टीमने टी-20 चॅम्पियनशिप पटकावली... इंग्लंडची टीम टी-20 चॅम्पियन आहे. आणि या विजयाचं श्रेय टीमने कोच अँडी फ्लॉवरला दिलंय. इंग्लंड टीमचा जेतेपदाचा प्रवास सुरु झाला टीम निवडीपासून...तरुण, बेडर आणि जिंकण्याची ईर्ष्या असलेल्या क्रिकेटर्सना कोच फ्लॉवर आणि कॅप्टन कॉलिंगवूडने एकत्र आणलं. आपण जिंकू शकतो हा विश्वास टीमला देणं हे त्यांचं पहिलं काम होतं...कॉलिंगवूडला महत्त्वाची साथ मिळाली ती केविन पीटरसनची. सततच्या दुखापती आणि खराब फॉर्म यामुळे पीटरसन अक्षरश: गांजला होता. पण पीटरसन आता संपला असं म्हणणार्‍यांना त्याने बॅटने चोख उत्तर दिलं. इंग्लंड टीमसाठी तो खर्‍या अर्थाने मॅन ऑफ द सीरिज ठरला. संपूर्ण स्पर्धेत त्याच्या बॅटला विश्रांती तेव्हाच मिळाली जेव्हा पहिल्या अपत्याच्या जन्मासाठी तो इंग्लंडला गेला होता.पीटरसन टीमचा आधारस्तंभ होता हे तर खरंच. पण कप्तानाला तेव्हाच खरा आनंद होतो जेव्हा टीममधले नवखे आणि अपरिचित चेहरे चांगली चमक दाखवून जातात. क्रेग किसवेटर हे नाव वर्ल्डकपपूर्वी फारसं कुणाला माहीत नव्हतं. पण आता त्याच्या रुपाने इंग्लंड टीमला चांगला ओपनर मिळालाय. इयॉन मॉर्गनने मोठ्या स्कोअरचा पाठलाग करताना चांगली जिगर दाखवून दिलीय.तर ल्युक राईटच्या परिस्थितीनुरुप बॅटिंग करण्याचा गुण या स्पर्धेत ठळकपणे दिसला. बॉलिंगमध्ये ग्रॅम स्वॅनने स्पिनर म्हणून आपली जबाबदारी चोख बजावली. तर स्टुअर्ट ब्रॉड आणि रायन साईडबॉटम यांनी आपल्या फास्ट बॉलिंगने समोरच्या टीमवर सातत्याने दबाव आणला. सुरुवातीला विकेट मिळवल्या. फिल्डर्सनीही जिवाचं रान केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅप्टन पॉल कॉलिंगवूडसाठी कप्तान म्हणून ही स्पर्धा नवसंजिवनी देणारी ठरलीय. एका वर्षापूर्वी त्याने वैतागून कप्तानी सोडली होती. एकूणच इंग्लंडच्या टीमसाठी हा टी-20 वर्ल्डकप संस्मरणीय ठरलाय एवढं नक्की.

आईबीएन लोकमत | Updated On: May 17, 2010 03:51 PM IST

इंग्लडनं अपयश काढलं धुवून

अमित बोस

17 मे

क्रिकेटचा जन्म हा इंग्लंडमध्ये झाला... पण इंग्लंड टीमला आतापर्यंत वर्ल्ड कप विजेतेपदाने हुलकावणीच दिली होती... 1979, 1987 आणि 1992 मध्ये इंग्लिश टीमने वर्ल्ड कप फायनलमध्ये धडक मारली खरी... पण विजेतेपदाचा ताज हा काही इंग्लंडच्या डोक्यावर चढला नाही... पण रविवारी वेस्ट इंडिजमध्ये गेल्या चार दशकांचं हे अपयश धुवून निघालं...

ऑस्ट्रेलियावर दणक्यात मात करत पॉल कॉलिंगवूडच्या इंग्लंड टीमने टी-20 चॅम्पियनशिप पटकावली...

इंग्लंडची टीम टी-20 चॅम्पियन आहे. आणि या विजयाचं श्रेय टीमने कोच अँडी फ्लॉवरला दिलंय. इंग्लंड टीमचा जेतेपदाचा प्रवास सुरु झाला टीम निवडीपासून...तरुण, बेडर आणि जिंकण्याची ईर्ष्या असलेल्या क्रिकेटर्सना कोच फ्लॉवर आणि कॅप्टन कॉलिंगवूडने एकत्र आणलं. आपण जिंकू शकतो हा विश्वास टीमला देणं हे त्यांचं पहिलं काम होतं...

कॉलिंगवूडला महत्त्वाची साथ मिळाली ती केविन पीटरसनची. सततच्या दुखापती आणि खराब फॉर्म यामुळे पीटरसन अक्षरश: गांजला होता. पण पीटरसन आता संपला असं म्हणणार्‍यांना त्याने बॅटने चोख उत्तर दिलं. इंग्लंड टीमसाठी तो खर्‍या अर्थाने मॅन ऑफ द सीरिज ठरला. संपूर्ण स्पर्धेत त्याच्या बॅटला विश्रांती तेव्हाच मिळाली जेव्हा पहिल्या अपत्याच्या जन्मासाठी तो इंग्लंडला गेला होता.

पीटरसन टीमचा आधारस्तंभ होता हे तर खरंच. पण कप्तानाला तेव्हाच खरा आनंद होतो जेव्हा टीममधले नवखे आणि अपरिचित चेहरे चांगली चमक दाखवून जातात. क्रेग किसवेटर हे नाव वर्ल्डकपपूर्वी फारसं कुणाला माहीत नव्हतं. पण आता त्याच्या रुपाने इंग्लंड टीमला चांगला ओपनर मिळालाय. इयॉन मॉर्गनने मोठ्या स्कोअरचा पाठलाग करताना चांगली जिगर दाखवून दिलीय.

तर ल्युक राईटच्या परिस्थितीनुरुप बॅटिंग करण्याचा गुण या स्पर्धेत ठळकपणे दिसला. बॉलिंगमध्ये ग्रॅम स्वॅनने स्पिनर म्हणून आपली जबाबदारी चोख बजावली. तर स्टुअर्ट ब्रॉड आणि रायन साईडबॉटम यांनी आपल्या फास्ट बॉलिंगने समोरच्या टीमवर सातत्याने दबाव आणला. सुरुवातीला विकेट मिळवल्या. फिल्डर्सनीही जिवाचं रान केलं.

आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅप्टन पॉल कॉलिंगवूडसाठी कप्तान म्हणून ही स्पर्धा नवसंजिवनी देणारी ठरलीय. एका वर्षापूर्वी त्याने वैतागून कप्तानी सोडली होती.

एकूणच इंग्लंडच्या टीमसाठी हा टी-20 वर्ल्डकप संस्मरणीय ठरलाय एवढं नक्की.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 17, 2010 03:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close