S M L

नक्षलवादी हल्ल्यात 30 ठार

17 मेछत्तीसगडमधील दंतेवाडाजवळच्या सुकमा इथे नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात 30 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 14 पोलीस आणि 16 नागरिकांचा समावेश आहे. या बसमधून 25 विशेष पोलीस अधिकारी प्रवास करत होते. त्याची माहिती नक्षलवाद्यांनी कशी मिळाली, याचीही चर्चा आता सुरू झाली आहे. स्फोटात उडवलेली बस 42 सीटर होती. त्यात 62 ते 70 प्रवासी होते, अशी माहिती छत्तीसगडचे नक्षलविरोधी पथकाचे विशेष महासंचालक विजय रामन यांनी दिला. या प्रवाशांमध्ये 25 विशेष पोलीस अधिकारी सिव्हिल ड्रेसमध्ये होते. हे पोलीस स्थानिक पातळीवर वॉलंटरी बेसिसवर पोलिसांसाठी काम करतात. ते सरकारी कर्मचारी नाहीत, असेही रामन यांनी सांगितले.गेल्या वर्षभरामध्ये नक्षलवाद्यांनी पोलीस आणि निमलष्करी दलाच्या जवानांना कायम लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. एक नजर टाकूयात गेल्या वर्षभरातल्या नक्षलवादी हल्ल्यांवर...1. 13 एप्रिल 2009 : ओरिसातील कोरापट इथल्या हल्ल्यात 11 निमलष्करी जवान शहीद2. 22 मे 2009 : गडचिरोलीमध्ये झालेल्या हल्ल्यात 16 पोलीस शहीद3. 10 जून 2009 : झारखंडमधील सारंडा इथे 9 पोलीस शहीद4. 13 जून 2009 : झारखंडमधील बोकारो इथे 10 पोलीस शहीद5. 31 जुलै 2009 : कर्नाटकातील विजापूर इथे एक विशेष पोलीस अधिकारी शहीद6. 8 ऑक्टोबर 2009 : गडचिरोलीमध्ये 17 पोलीस शहीद7. 15 फेब्रुवारी 2010 : पश्चिम बंगालमधील पश्चिम मिदनापूरमध्ये 24 जवान शहीद8. 4 एप्रिल 2010 : ओरिसातील कोरापट इथे 11 जवान शहीद9. 6 एप्रिल 2010 : दंतेवाडामधील हल्ल्यात 76 जवान शहीद

आईबीएन लोकमत | Updated On: May 17, 2010 05:35 PM IST

नक्षलवादी हल्ल्यात 30 ठार

17 मे

छत्तीसगडमधील दंतेवाडाजवळच्या सुकमा इथे नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात 30 जणांचा मृत्यू झाला आहे.

यात 14 पोलीस आणि 16 नागरिकांचा समावेश आहे.

या बसमधून 25 विशेष पोलीस अधिकारी प्रवास करत होते. त्याची माहिती नक्षलवाद्यांनी कशी मिळाली, याचीही चर्चा आता सुरू झाली आहे.

स्फोटात उडवलेली बस 42 सीटर होती. त्यात 62 ते 70 प्रवासी होते, अशी माहिती छत्तीसगडचे नक्षलविरोधी पथकाचे विशेष महासंचालक विजय रामन यांनी दिला.

या प्रवाशांमध्ये 25 विशेष पोलीस अधिकारी सिव्हिल ड्रेसमध्ये होते. हे पोलीस स्थानिक पातळीवर वॉलंटरी बेसिसवर पोलिसांसाठी काम करतात. ते सरकारी कर्मचारी नाहीत, असेही रामन यांनी सांगितले.

गेल्या वर्षभरामध्ये नक्षलवाद्यांनी पोलीस आणि निमलष्करी दलाच्या जवानांना कायम लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. एक नजर टाकूयात गेल्या वर्षभरातल्या नक्षलवादी हल्ल्यांवर...

1. 13 एप्रिल 2009 : ओरिसातील कोरापट इथल्या हल्ल्यात 11 निमलष्करी जवान शहीद

2. 22 मे 2009 : गडचिरोलीमध्ये झालेल्या हल्ल्यात 16 पोलीस शहीद

3. 10 जून 2009 : झारखंडमधील सारंडा इथे 9 पोलीस शहीद

4. 13 जून 2009 : झारखंडमधील बोकारो इथे 10 पोलीस शहीद

5. 31 जुलै 2009 : कर्नाटकातील विजापूर इथे एक विशेष पोलीस अधिकारी शहीद

6. 8 ऑक्टोबर 2009 : गडचिरोलीमध्ये 17 पोलीस शहीद

7. 15 फेब्रुवारी 2010 : पश्चिम बंगालमधील पश्चिम मिदनापूरमध्ये 24 जवान शहीद

8. 4 एप्रिल 2010 : ओरिसातील कोरापट इथे 11 जवान शहीद

9. 6 एप्रिल 2010 : दंतेवाडामधील हल्ल्यात 76 जवान शहीद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 17, 2010 05:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close