S M L

1, 229 घरांची लॉटरी जाहीर

18 मेम्हाडाच्या 3, 449 घरांसाठीच्या लॉटरीला सकाळी साडेनऊपासून सुरुवात झाली आहे. आतापर्यंत पहिल्या टप्प्यात 1, 229 घरांची लॉटरी जाहीर झाली आहे. मानखुर्द, तुर्भे- मंडाळे, घाटकोपर कॅनरा इंजीनिअरिंग येथील अल्प आणि अत्यल्प घरांसाठीची लॉटरी पूर्ण झाली. रामचंद्र रामप्यारे हे पहिले भाग्यवान विजेते ठरले. म्हाडाच्या लॉटरीत प्रभाकर शिंदे दुसरे तर दिपक किल्लेदार तिसरे विजेते ठरले. वांद्र्याच्या रंगशारदा सभागृहात 3 हजार 449 घरांसाठी ही सोडत सुरु आहे. माजी सैनिकांसाठी 20 घरे आरक्षित ठेवण्यात आली होती. पण यासाठी फक्त 12 अर्ज आल्याने या सगळ्यांना घरे मिळाली आहेत. तर 8 घरे शिल्लक ठेवण्यात आली आहेत. या वर्षी 3 हजार 449 घरे म्हाडाने विक्रीसाठी काढली आहेत. त्यासाठी सव्वातीन लाखांहून अधिक अर्ज म्हाडाकडे आलेत. दरम्यान अनेकांनी एकाच वेळी वेबसाईटला व्हिजिट दिल्याने म्हाडाची वेबसाईट हँग झाली आहे

आईबीएन लोकमत | Updated On: May 18, 2010 09:00 AM IST

1, 229 घरांची लॉटरी जाहीर

18 मे

म्हाडाच्या 3, 449 घरांसाठीच्या लॉटरीला सकाळी साडेनऊपासून सुरुवात झाली आहे. आतापर्यंत पहिल्या टप्प्यात 1, 229 घरांची लॉटरी जाहीर झाली आहे.

मानखुर्द, तुर्भे- मंडाळे, घाटकोपर कॅनरा इंजीनिअरिंग येथील अल्प आणि अत्यल्प घरांसाठीची लॉटरी पूर्ण झाली. रामचंद्र रामप्यारे हे पहिले भाग्यवान विजेते ठरले. म्हाडाच्या लॉटरीत प्रभाकर शिंदे दुसरे तर दिपक किल्लेदार तिसरे विजेते ठरले. वांद्र्याच्या रंगशारदा सभागृहात 3 हजार 449 घरांसाठी ही सोडत सुरु आहे.

माजी सैनिकांसाठी 20 घरे आरक्षित ठेवण्यात आली होती. पण यासाठी फक्त 12 अर्ज आल्याने या सगळ्यांना घरे मिळाली आहेत. तर 8 घरे शिल्लक ठेवण्यात आली आहेत.

या वर्षी 3 हजार 449 घरे म्हाडाने विक्रीसाठी काढली आहेत. त्यासाठी सव्वातीन लाखांहून अधिक अर्ज म्हाडाकडे आलेत. दरम्यान अनेकांनी एकाच वेळी वेबसाईटला व्हिजिट दिल्याने म्हाडाची वेबसाईट हँग झाली आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 18, 2010 09:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close