S M L

गडचिरोलीत माओवाद्यांनी 30 वाहनं जाळली

Sachin Salve | Updated On: Dec 23, 2016 07:25 PM IST

गडचिरोलीत माओवाद्यांनी 30 वाहनं जाळली

23 डिसेंबर :  गडचिरोलीच्या सूरजागड खाणीच्या परिसरात माओवाद्यांनी तीस वाहनं जाळण्याची घटना घडलीये. जाळलेल्या वाहनांमध्ये डंपर आणि ट्रक्सचा समावेश आहे. एटापल्ली तालुक्यातल्या सूरजागडच्या डोंगरावर ही घटना घडलीये.

सूरजागडच्या डोंगरावर खाणीसाठी उत्खनन सुरू आहे. या कामासाठी ही वाहनं या परिसरात होती. माओवाद्यांनी वाहनांच्या चालकांना खाली उतरवलं. त्यानंतर वाहनांना आग लावण्यात आली. माओवाद्यांनी वाहनांच्या चालकांना बेदम मारहाणही केली. या मारहाणीत काही ड्रायव्हर बेशुद्ध झाल्याची माहिती आहे. या वाहनचालकांना काहीवेळासाठी ओलीसही ठेवण्यात आलं होतं. दुपारी तीनच्या वेळेस त्यांना सोडून देण्यात आलं. सूरजागड परिसरात झालेल्या जाळपोळीमुळे परिसरात दहशतीचं वातावरण आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 23, 2016 07:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close