S M L

थर्टीफस्टचा फिव्हर,चोरी केली 1 लाखांची 'बिअर' !

Sachin Salve | Updated On: Dec 23, 2016 09:31 PM IST

थर्टीफस्टचा फिव्हर,चोरी केली 1 लाखांची 'बिअर' !

23 डिसेंबर : चोर काय चोरी करेल याचा नेम नाही. थर्डीफस्टच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये चोरट्यांनी चक्क बिअर बारवर डल्ला मारलाय. तब्बल 1 लाख 38 हजारांची बिअर चोरट्यांनी लंपास केलीये.

निफाड तालुक्यातील शिवरे फाट्याजवळ असलेल्या छत्रपती बिअर बार हॉटेलमध्ये चोरीची घटना घडली होती. चोरीची ही दृष्ये सिसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. दोन चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास हॉटेलचा मुख्य दरवाजा तोडुन गोडाऊन मध्ये प्रवेश केला. तब्बल 1 लाख 38 हजार रुपये किमतीचे बिअरचे बॉक्स लंपास केले. तसंच कॅश काऊंटर मधून 25 हजार रुपये रोख रक्कम लंपास केली. या बाबत निफाड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 23, 2016 09:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close