S M L

निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन शिवस्मारकाचं भूमिपूजन -अजित पवार

Sachin Salve | Updated On: Dec 23, 2016 09:45 PM IST

निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन शिवस्मारकाचं भूमिपूजन -अजित पवार

 

23 डिसेंबर : निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचा घाट घातल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलाय. तसंच भूमिपूजनाच्या जाहिरातीसाठी सरकारनं 18 कोटींची उधळपट्टी करुन जनतेला मूर्ख बनवत आहे अशी टीकाही त्यांनी केलाय. ते बारामतीत बोलत होते.

नुकत्याच पार पडलेल्या बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणून आलेल्या नवनिर्वाचित नगराध्यक्षासह नगरसेवकांचा सत्कार समारंभ आज बारामतीत आयोजित केला होता त्यावेळी अजित पवारांनी शिवस्मारकाच्या भूमिपूजनावरुन सरकारवर टीका केली.

ऱाज्यात महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवुन छत्रपती शिवाजी महारांजाचे स्मारक अरबी समुद्रात भूमिपूजन करण्याचा प्रयत्न असून भूमिपूजनाव्यतिरीक्त भाजप शिवसेना सरकार काहीही करत नसून जाहिरातीवर मात्र अनाठायी खर्च करत आहेतय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदुमिलचे भूमिपूजन झाले असताना अजून त्याठिकाणी एक खड्डादेखील यांनी खोदला नाही तर याबाबत अजून ठोस निर्णय या सरकारने केलेले नाही. केवळ निवडणुका डोळयासमोर ठेवूनच हा निर्णय घेतल्याची टीका अजित पवार यांनी केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 23, 2016 09:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close