S M L

मुंबईतील पवई लेकमध्ये हाऊसबोट उलटली, तिघे बेपत्ता

Samruddha Bhambure | Updated On: Dec 24, 2016 12:18 PM IST

मुंबईतील पवई लेकमध्ये हाऊसबोट उलटली, तिघे बेपत्ता

24 डिसेंबर : मुंबईतील पवईच्या तलावात बोट उलटली आहे. यात बोटीतील आठही जण पाण्यात बुडाले. काल रात्री ही दुर्घटना घडली आहे. बोटीतील प्रवासी पार्टी करण्यासाठी जात असताना हा प्रकार घडला आहे.

पवई तलावात रात्री 10.30 ते 11च्या सुमारास ही बोट उलटली. बुडालेली बोट हाऊस बोट असल्याचं समोर आलं आहे. बोटीतील 8ही जण पाण्यात बुडाले, मात्र त्यापैकी दोघांना स्थानिकांनी वाचवलं. तर तिघे स्वत: पाण्यातूव पोहत वर आले. बुडालेले तिघेजण अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध पोलीस आणि अग्नीशमन दलाकडून सुरु आहे.

ही हाऊसबोट एका रॉडला अडकून उलटली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हाऊसबोटीवर पवई तलावात कायदेशीर बंदी असतानाही ही बोट कशी काय वापरली जात होती, याचा शोध सुरु आहे. तसंच या पार्टीला परवानगी कोणी दिली याचीही चौकशी सुरु आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 24, 2016 09:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close