S M L

'दंगल' पाहून सलमान भारावला

Sonali Deshpande | Updated On: Dec 25, 2016 03:58 PM IST

'दंगल' पाहून सलमान भारावला

25 डिसेंबर: बॉलिवूडचा सुलतान सलमान खानसाठी काल रात्री 'दंगल'चं खास स्क्रिनिंग पार पडलं.आपल्या लाडक्या मित्राला हा सिनेमा दाखवण्यासाठी आमिर स्वतः हजर होता.हा सिनेमा पाहिल्यानंतर मात्र सलमान पुरता भारावून गेला.

आजवर आमिर लगान हा त्याच्या करिअरमधला सर्वोत्कृष्ट सिनेमा होता असं सांगत असतो.मात्र दंगल पाहिल्यानंतर हा सिनेमा त्यापेक्षा कैक पटींनी सरस असल्याचं सलमाननं म्हटलंय. कथा, संवाद, अभिनय, दिग्दर्शन आणि सादरीकरण या सगळ्याच बाबतीत सलमानने या सिनेमाला पैकीच्या पैकी मार्क दिलेत.

यापूर्वी सलमानच्या कुटुंबियांनी दंगल पाहून तो सुलतानपेक्षा चांगला सिनेमा असल्याचा फिडबॅक सलमानला दिला होता. मात्र आता सलमानने हा सिनेमा पाहिल्यावर त्यालाही याची खात्री पटलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 25, 2016 01:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close