S M L

इंडिका कारमधून 35लाखांची रोकड जप्त

Sonali Deshpande | Updated On: Dec 25, 2016 05:10 PM IST

इंडिका कारमधून 35लाखांची रोकड जप्त

25 डिसेंबर : काल रात्री नवी मुंबईतल्या खांदेश्वरच्या आदई नाक्याजवळ नाकाबंदी सुरू असताना खांदेश्वर पोलिसांनी एका इंडिका कारमधून तब्बल 35 लाखांची रोकड जप्त केली आहे. तसंच सोबत 2 किलो सोन्याची बिस्किटं देखील त्यांच्याकडे सापडली.

जप्त केलेल्या रोख रकमेत सगळ्याच 2000च्या नवीन नोटा होत्या.याप्रकरणी खांदेश्वर पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतलं असून यातील 4 जण हे पुण्याचे आहेत तर 2 जण हे नवी मुंबईतले असल्याची माहिती समोर आली आहे.

यासंबंधी इनकम टॅक्स विभागाला कळवण्यात आलंय.तसंच पोलीस अधिक तपास करतायत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 25, 2016 04:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close