S M L

भुजबळांचा निकटवर्तीय छबू नागरेविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल

Sachin Salve | Updated On: Dec 26, 2016 05:56 PM IST

 भुजबळांचा निकटवर्तीय छबू नागरेविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल

26 डिसेंबर :  राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांचा निकटवर्तीय आणि राष्ट्रवादीचा पदाधिकारी असलेल्या छबू नागरेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. बनावट नोटा छापल्याप्रकरणी पोलिसांनी छबू नागरेला काही दिवसांपूर्वी अटक केली होती. त्याच्याकडून 1 कोटी 36 लाखांच्या पाचशे आणि हजाराच्या जुन्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या.

छबू नागरेसह पोलिसांनी अकरा जणांना अटक केली होती. छबूच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आलीये. छबू 200 कोटींच्या बनावट नोटा छापणार होता अशी कबुली त्यानं चौकशीत दिलीये. नागरेच्या खुटवड भागातल्या ब्युटी पार्लरमध्ये बनावट नोटांची छपाई होत होती. तिथून पोलिसांनी स्कॅनर प्रिंटर, शाई आणि कागद जप्त केलाय. छबूचा साथीदार रामराव पाटील हा बनावट नोटा चलनात आणण्य़ाचं काम करीत होता. तसंच त्याचा दुसरा साथीदार संदीप सस्तेच्या घरातून पोलिसांनी 10 सीम कार्ड जप्त करण्यात आलीयेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 26, 2016 05:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close