S M L

आबांकडून बागवेंना क्लीन चिट

18 मेगृहमंत्री आर. आर. पाटील यांनी अखेर गृह राज्यमंत्री रमेश बागवेंना क्लीन चिट दिली आहे. बागवे यांच्यावरील 19 गुन्हे खूप जुने आहेत. तसेच ते त्यातून निर्दोष सुटले आहेत, असेही आर. आर. यांनी म्हटले आहे.आजच बागवे यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर बाजू मांडली. यावेळी या गुन्ह्यांमधील तथ्य तसेच, या गुन्ह्यांमधून झालेली निर्दोष सुटका लक्षात न घेता पुण्याचे कमिशनर सत्यपाल सिंग यांनी या गुन्ह्यांची यादी पासपोर्ट ऑफिसला पाठवली, असा आरोप बागवेंनी केला.सत्यपाल सिंग यांच्या बदलीवरून आर. आर. आणि बागवे यांच्यात झालेले मतभेद सभागृहातही पाहण्यास मिळाले होते. तसेच आत्तापर्यंत सत्यपाल आणि बागवे यांच्यातील शीतयुद्धाबद्दल आर. आर. यांनी मौन बाळगले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: May 18, 2010 03:56 PM IST

आबांकडून बागवेंना क्लीन चिट

18 मे

गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी अखेर गृह राज्यमंत्री रमेश बागवेंना क्लीन चिट दिली आहे. बागवे यांच्यावरील 19 गुन्हे खूप जुने आहेत. तसेच ते त्यातून निर्दोष सुटले आहेत, असेही आर. आर. यांनी म्हटले आहे.

आजच बागवे यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर बाजू मांडली. यावेळी या गुन्ह्यांमधील तथ्य तसेच, या गुन्ह्यांमधून झालेली निर्दोष सुटका लक्षात न घेता पुण्याचे कमिशनर सत्यपाल सिंग यांनी या गुन्ह्यांची यादी पासपोर्ट ऑफिसला पाठवली, असा आरोप बागवेंनी केला.

सत्यपाल सिंग यांच्या बदलीवरून आर. आर. आणि बागवे यांच्यात झालेले मतभेद सभागृहातही पाहण्यास मिळाले होते. तसेच आत्तापर्यंत सत्यपाल आणि बागवे यांच्यातील शीतयुद्धाबद्दल आर. आर. यांनी मौन बाळगले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 18, 2010 03:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close