S M L

राज्यातील सिंचन प्रकल्पांना नाबार्डकडून 756 कोटींचं कर्ज

Sachin Salve | Updated On: Dec 26, 2016 11:51 PM IST

राज्यातील सिंचन प्रकल्पांना नाबार्डकडून 756 कोटींचं कर्ज

nabard326 डिसेंबर : पंतप्रधान कृषी सिंचन योजना (AIBP) अंतर्गत महाराष्ट्रातील 26 मोठे आणि मध्यम पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राला नाबार्डकडून 756 कोटीचे दिर्घ मुदतीचे अल्प व्याजदराने  कर्जाचे वितरण करण्यात आले आहे.

दिल्लीत  इंडियन हॅबिटॅट सेंटर नवी दिल्ली येथे झालेल्या एका कार्यक्रमात महाराष्ट्राला 756 कोटीचे नाबार्ड कर्ज वितरीत  करण्यात आले. याच वेळी गुजारातलाही 463 कोटीचे कर्ज वितरीत  करण्यात आले. देशातील या 99 प्रकल्पात महाराष्ट्रातील 26 अपूर्ण सिंचन प्रकल्पांचा समावेश आहे. केंद्र शासनाने यापूर्वीच ऑक्टोंबर 2016 मध्ये 339.40 कोटीचे अर्थसहाय्याचा पहिला हप्ता उपलब्ध करुन दिला होता. या योजनेत वाघुर, बावनथडी ,निम्न नुधना, तिलारी, निम्न वर्धा, निम्न पांझरा, नांदुर मधमेश्वर टप्पा-2, गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प, ऊर्ध्व पैनगंगा, बेंबळा, तारळी, धोमबलकवडी, अर्जुना ऊर्ध्व कुंडलीका, अरुणा, कृष्णा-वारणा उसिंयो, गडनदी, डोंगरगाव, सांगोला शाखा कालवा, खडकपूर्णा वारणा, मोरणा(गुरेघर), निम्न पेढी, वांग, नरडवे(महमद वाडी), कुडाळी इ.प्रकल्पांचा समावेश आहे.

केंद्र शासनाच्या या निर्णयानुसार राज्यातील अपूर्ण 26 प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सन 2016-17 ते सन 2019-20 या कालावधीत एकूण 3830 कोटी इतके केंद्रीय अर्थसहाय्य मिळणे अपेक्षित आहे. तसंच राज्य शासनास सदर प्रकल्प पूर्ण करणेसाठी आवश्यक राज्य शासनाच्या हिस्स्याची रक्कम निश्चितपणे उपलब्ध करून देता यावी, यासाठी नाबार्डच्या माध्यमातून दिर्घकालीन ( 15 वर्ष मुदतीचे ) आणि सवलतीच्या दरात सुमारे 6 टक्के व्याज दराने कर्जाची सुविधा निर्माण करून दिली आहे. या योजनेतून सिंचन लाभ योजनेतील  26 प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एप्रिल 2016 ते डिंसेबर 2019 या कालावधीत 12773 कोटी इतके कर्जसहाय्य उपलब्ध होणारे आहे. सदर 26 प्रकल्प पूर्ण झाल्यावर 5.56 लक्ष हेक्टर अतिरीक्त सिंचन क्षमता निर्माण होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 26, 2016 11:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close