S M L

शीना बोरा हत्याकांड : इंद्राणी मुखर्जीला एका दिवसाचा जामीन

Sachin Salve | Updated On: Dec 27, 2016 04:45 PM IST

indrani mukharjee_sheena bora27 डिसेंबर : शीना बोरा हत्याकांड प्रकरणी आरोपी असलेली इंद्राणी मुखर्जी एक दिवसाच्या जामिनावर बाहेर आली आहे.

इंद्राणी मुखर्जीच्या वडीलांचं काही दिवसांपूर्वी निधन झालंय. त्यांच्यावर वडीलांचं कार्य करण्यासाठी आठवड्याभराचा जामीन मिळावा अशी मागणी इंद्राणीने कोर्टात केली होती. पण ती मागणी मंजूर न करता, एक दिवसाचा जामीन देण्यात आलाय.

अगोदर इंद्राणीला अंत्यविधी पार पाडण्यासाठी आसामला जायचं होतं पण आता एकच दिवसाचा जामीन असल्यामुळे मुलुंडच्या ब्राम्हण संघात तिनं वडीलांचे अंत्यविधी पूर्ण केले. शीना बोरा ही इंद्राणी मुखर्जीची पहिली मुलगी होती आणि तिचा खून केल्याच्या आरोपाखाली सध्या ती अटकेत आहे. ह्या खून प्रकरणानं देशाच्या कार्पोरेट जगतात खळबळ माजलेली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 27, 2016 04:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close