S M L

रतन टाटा संघ मुख्यालयात, भागवतांशी बंद द्वार चर्चा

Sachin Salve | Updated On: Dec 28, 2016 07:54 PM IST

रतन टाटा संघ मुख्यालयात, भागवतांशी बंद द्वार चर्चा

28 डिसेंबर : टाटा सन्स उद्योगसमूहाचे हंगामी चेअरमन रतन टाटा आज नागपूरच्या रेशीमबागमधल्या संघ मुख्यालयात गेले होते. सरसंघचालक मोहन भागवत आणि रतन टाटा यांची बंद दाराआड चर्चा झाली. सायरस मिस्री यांच्या हकालपट्टीनंतर ही भेट झाल्यामुळे चर्चेला उधाण आलंय.

याआधी रतन टाटा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घेतली होती. टाटा ग्रुपच्या चेअरमनपदावरून सायरस मिस्त्री यांची हकालपट्टी झाल्यानंतर रतन टाटा पंतप्रधानांना भेटले होते. त्यामुळे तेव्हाही बरीच चर्चा रंगली होती.

रतन टाटा आणि मोहन भागवत यांच्या भेटीचा तपशील अजून कळू शकलेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 28, 2016 05:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close