S M L

राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा, 45 उमेदवारांची यादीही जाहीर

Sachin Salve | Updated On: Dec 29, 2016 06:25 PM IST

राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा, 45 उमेदवारांची यादीही जाहीर

29 डिसेंबर :  मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचाराचा नारळ फोडलाय. राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा दिला असून 45 उमेदवारांची यादी जाहीर केलीये.

मुंबई महापालिकेसह राज्यातील 10 महापालिका निवडणुका लवकरच जाहीर होणार आहे.  मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वात प्रथम यादी जाहीर करून प्रचाराचा नारळ फोडलाय. मुंबई महापालिका निवडणुकांसाठी  राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं 45 उमेदवारींची पहिली यादी जाहीर केलीय. मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन ही पहिली यादी जाहीर केली. तर आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार असल्याचंही अहिर यांनी सांगितलंय.

तर, नोटबंदीच्या निर्णयामुळे दहशतवाद कमी होईल, असं मोदी सांगत होते पण अतिरेकी कारवाया सुरूच आहेत. आपले जवान शहीद होत आहेत आणि लोकांनाही एटीएमच्या रांगेत त्रास झाला,अनेकजण मृत्यूमुखी पडले आहे. याला जबाबदार कोण आहे ? असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थिती केला.

जिल्हा परिषद, महानगर पालिकांमध्ये आघाडी करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात येणार असल्याचं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान,  काँग्रेसनंही राष्ट्रवादीसोबत एकत्र लढणार नसल्याच्या बातमीला दुजोरा दिला. काँग्रेस मुंबईत राष्ट्रवादीशी आघाडी करणार नाही. ही आमची आधीपासूनची भूमिका आहे असं मुंबईचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी स्पष्ट केलं.

 

ही आहे 45 उमेदवारांची यादी

ncp_list

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 29, 2016 04:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close