S M L

आयुक्त मुंढेंचे तीन धाडसी निर्णय

Sonali Deshpande | Updated On: Dec 30, 2016 02:06 PM IST

tukaram_mundhe

30डिसेंबर: नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज 3 महत्त्वाचे धाडसी निर्णय घेतलेत.नवी मुंबईतील 43 हजार झोपडीधारकांना 16 कागदपत्रांऐवजी फक्त आधारकार्ड आणि झोपडपट्टी सर्वेक्षणावर वैयक्तिक नळ जोडणी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आयुक्त मुंढे यांच्या निर्णयामुळे झोपडपट्टी धारकांची पाण्यासाठीची वणवण थांबणाराय.

तर दुसरीकडे शहरातील ओसी नसलेल्या 10 हजार इमारतींना ओसी नसल्याने टँकरचे पाणी प्यावे लागत होते. या इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना शुध्द पाणी मिळावं यासाठी आता यापुढे या सर्व इमारतींना कमर्शिअल दराने महापालिका पाणी पुरवठा करणार आहे.त्यामुळे मुंढेंना हटवण्यासाठी नवी मुंबई महापालिकेत अविश्वास ठराव बहुमतानं मंजूर करण्यात आला असताना आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात ह्या बद्दल उत्सुकता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 30, 2016 02:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close