S M L

थर्टी फर्स्टचं प्लॅनिंग करताय ?, एकदा हे नियम जाणून घ्या !

Sachin Salve | Updated On: Dec 30, 2016 09:48 PM IST

31st_party430 डिसेंबर : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सगळीकडेच जय्यत तयारी सुरू झालीये. खास करून तळीरामांनी 'झिंगाट' होण्यासाठी खास प्लॅनिंग आखलं असले.  मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारु विक्री, बाळगण्यादर्भात, पार्टी करण्यासंदर्भात काही निर्बंध घातलेत.

महामार्गापासून 500 मीटरच्या परिसरात मद्याचा वापर करता येणार नाही, असा आदेश उत्पादन शुल्क विभागाने दिला आहे. देशभरातील अपघातांच्या वाढत्या संख्येमुळे सर्वोच्च न्यायालयाने राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवर मद्यविक्रीला बंदी घातली आहे. याचा निर्णयाचा परिणाम म्हणून राज्यानेही शहरातील दारु पार्ट्यावर निर्बंध घातले आहेत. हौसिंग सोसायटी, बँक्वेट हॉल तसंच खुल्या मैदानावर थर्टी फर्स्ट डिसेंबरची पार्टी आयोजित करण्याच्या विचारात असणाऱ्यांचा प्लॅन सरकारच्या निर्णयामुळे बारगळणार आहे.

काय आहेत नियम

 - 31 डिसेंबरला ऑनलाईन दारु परवाना मिळेल

- महामार्गापासून 500 मीटरच्या परिसरात मद्य मिळणार नाही

- सुप्रीम कोर्टाच्या निर्णय़ानंतर सरकारचा निर्णय़

- रस्ते अपघातांच्या वाढत्या संख्येनंतर सुप्रीम कोर्टाने राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गावर मद्य विक्रीस बंदी केली

- शहरातील दारु पार्ट्यांवर निर्बंध

- हाउसिंग सोसायटी , बँक्वेट हॉल तसंच खुल्या मैदानावर पार्टींना परवानगी नाही

- संध्याकाळी 10 ते पहाटे 5 पर्यंत मद्य विक्रीसाठी परवानगी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 30, 2016 06:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close