S M L

गटार कामांमुळे नाशिकमध्ये नागरिक त्रस्त

19 मेशहरांची विकासाची प्रचिती ही त्या त्या शहरातील रस्त्यांवरून येत असते. पण राज्यातील अनेक शहरांमध्ये रस्त्यात खड्डे आहेत की खड्‌ड्यात रस्ते हा प्रश्न पडतो. नाशिकमध्ये तर महापालिकेने सुरू केलेल्या पावसाळी गटार योजनेच्या कामांमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याविरोधात आज काँग्रेसने आंदोलन केले. शहरात जिथे जिथे अशी कामे सुरू आहेत, त्या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेधाचे बॅनर्स लावत आंदोलन केले. तसेच ही कामे तातडीने पूर्ण केली नाहीत तर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला. तर राष्ट्रवादीने महापालिकेसमोर धरणे आंदोलन धरले.खासदार उतरले रस्त्यावरनाशिकमध्ये पावसाळी गटार योजनेसाठी खोदलेल्या रस्त्यांबद्दल शेवटी खासदारांना रस्त्यावर उतरावे लागले. ही कामे संपवण्यासाठी पालिका आयुक्तांनी 15 मार्चची मुदत दिली होती. पण त्यानंतरही रस्त्यांची खोदकामे सुरूच आहेत. त्यातून लोकांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यात ठेकेदार ही माती वरवर दडपत असल्याने येत्या पावसाळ्यात नाशिकच खड्‌ड्यात जाण्याची शक्यता आहे. खासदार समीर भुजबळ यांनी या कामांची पाहाणी करून आयुक्तांची भेट घेतली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 19, 2010 03:43 PM IST

गटार कामांमुळे नाशिकमध्ये नागरिक त्रस्त

19 मे

शहरांची विकासाची प्रचिती ही त्या त्या शहरातील रस्त्यांवरून येत असते. पण राज्यातील अनेक शहरांमध्ये रस्त्यात खड्डे आहेत की खड्‌ड्यात रस्ते हा प्रश्न पडतो.

नाशिकमध्ये तर महापालिकेने सुरू केलेल्या पावसाळी गटार योजनेच्या कामांमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

याविरोधात आज काँग्रेसने आंदोलन केले. शहरात जिथे जिथे अशी कामे सुरू आहेत, त्या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेधाचे बॅनर्स लावत आंदोलन केले.

तसेच ही कामे तातडीने पूर्ण केली नाहीत तर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला. तर राष्ट्रवादीने महापालिकेसमोर धरणे आंदोलन धरले.

खासदार उतरले रस्त्यावर

नाशिकमध्ये पावसाळी गटार योजनेसाठी खोदलेल्या रस्त्यांबद्दल शेवटी खासदारांना रस्त्यावर उतरावे लागले. ही कामे संपवण्यासाठी पालिका आयुक्तांनी 15 मार्चची मुदत दिली होती.

पण त्यानंतरही रस्त्यांची खोदकामे सुरूच आहेत. त्यातून लोकांची प्रचंड गैरसोय होत आहे.

त्यात ठेकेदार ही माती वरवर दडपत असल्याने येत्या पावसाळ्यात नाशिकच खड्‌ड्यात जाण्याची शक्यता आहे. खासदार समीर भुजबळ यांनी या कामांची पाहाणी करून आयुक्तांची भेट घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 19, 2010 03:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close