S M L

माहिमतुराला पोलीस कोठडी

20 मे एक कोटींची लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या मुंबई महापालिकेच्या हायराईज कमिटीचा सदस्य शैलेश माहिमतुरा याला 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.माहिमतुरा सध्या छातीत दुखत असल्याने हॉस्पिटलमध्ये ऍडमीट आहे.पण माहिमतुरा हा सरकारी कर्मचारी नसल्याने त्याच्याविरुद्ध सरकारी अधिकार्‍याने लाच घेतल्याचे कलम लागू शकत नाही, असायुक्तिवाद केला गेला. त्यामुळे त्याच्याविरुद्ध योग्य ते कलम लावावे, असे त्याच्या वकिलांचे म्हणणे होते. पण कोर्टाने खटल्याच्या सुनावणी दरम्यान याचा विचार केला जाईल, असे सांगत सध्या हा युक्तिवाद फेटाळला. आता पोलिसांना दोन तास माहिमतुराची चौकशी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच चौकशीदरम्यान त्याच्या वकिलांना उपस्थित राहण्याची परवानगीही देण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 20, 2010 12:17 PM IST

माहिमतुराला पोलीस कोठडी

20 मे

एक कोटींची लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या मुंबई महापालिकेच्या हायराईज कमिटीचा सदस्य शैलेश माहिमतुरा याला 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

माहिमतुरा सध्या छातीत दुखत असल्याने हॉस्पिटलमध्ये ऍडमीट आहे.

पण माहिमतुरा हा सरकारी कर्मचारी नसल्याने त्याच्याविरुद्ध सरकारी अधिकार्‍याने लाच घेतल्याचे कलम लागू शकत नाही, असायुक्तिवाद केला गेला. त्यामुळे त्याच्याविरुद्ध योग्य ते कलम लावावे, असे त्याच्या वकिलांचे म्हणणे होते.

पण कोर्टाने खटल्याच्या सुनावणी दरम्यान याचा विचार केला जाईल, असे सांगत सध्या हा युक्तिवाद फेटाळला.

आता पोलिसांना दोन तास माहिमतुराची चौकशी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच चौकशीदरम्यान त्याच्या वकिलांना उपस्थित राहण्याची परवानगीही देण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 20, 2010 12:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close