S M L

खेळाडू मरियप्पनवर बनतोय सिनेमा

Sonali Deshpande | Updated On: Jan 3, 2017 11:34 AM IST

खेळाडू मरियप्पनवर बनतोय सिनेमा

03 जानेवारी : सध्या जमाना चरित्रपटांचा आहे. 'एम.एस.धोनी' आणि 'दंगल'नेही लोकांची पसंती मिळवली.याच रांगेत येतोय अजून एक बायोपिक,ज्याचं नाव आहे 'मरियप्पन'.

दक्षिण भारताच्या या मरियप्पन थांगवेलूने पुरुषांच्या उंच उडीत सुवर्णपदक जिंकून रियो पॅराआॅलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली होती. देशासाठी अभिमानाचं पदक आणणारा तो तिसरा भारतीय अपंग खेळाडू ठरला.

त्याच्या जीवनावर आधारित हा सिनेमा या वर्षात तामिळ आणि इंग्रजी भाषेत रिलीज होणार आहे. त्याचं दिग्दर्शन रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या धनुष करणार आहे.

 

त्याचं पोस्टर शाहरुख खाननं ट्विट करून लाँच केलंय. सोबत चित्रपट आणि टीमला शुभेच्छाही दिल्यात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 3, 2017 09:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close