S M L

औरंगाबादचे मनसे नगरसेवक शिवसेनेत

20 मेबदलापूरनंतर आता औरंगाबाद महापालिकेत मनसेचे एकमेव नगरसेवक राज वानखेडे शिवसेना-भाजप युतीच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीत दाखल झालेत. महापौर पदाच्या निवडणुकीत गैरहजर राहणारे मनसे नगरसेवक राज वानखेडे विकासाच्या मुद्यावर शिवसेना-भाजपच्या आघाडीसोबत आलेत. स्थायी समितीच्या 16 सदस्य निवडीसाठी महापालिकेची आज सर्वसाधारण सभा झाली. यात विभागीय आयुक्त यांच्याकडं नोंदवण्यात आलेल्या शिवसेना-भाजपा युतीच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीत मनसे नगरसेवकाचे नाव असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. या आघाडीत 56 सदस्य आहेत. ही आघाडी आगामी 5 वर्षांसाठी नोंदणीकृत करण्यात आली आहे. तर आपण वैयक्तिक शिवसेनेसोबत नसून राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील भाजपा, अपक्ष, रिपाइं डेमोक्रेटीक यांच्यासोबत आहोत. विकास कामांच्या आधारे आपण महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठींबा दिल्याचे मनसेच्या राज वानखेडे यांनी सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: May 20, 2010 01:19 PM IST

औरंगाबादचे मनसे नगरसेवक शिवसेनेत

20 मे

बदलापूरनंतर आता औरंगाबाद महापालिकेत मनसेचे एकमेव नगरसेवक राज वानखेडे शिवसेना-भाजप युतीच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीत दाखल झालेत.

महापौर पदाच्या निवडणुकीत गैरहजर राहणारे मनसे नगरसेवक राज वानखेडे विकासाच्या मुद्यावर शिवसेना-भाजपच्या आघाडीसोबत आलेत.

स्थायी समितीच्या 16 सदस्य निवडीसाठी महापालिकेची आज सर्वसाधारण सभा झाली. यात विभागीय आयुक्त यांच्याकडं नोंदवण्यात आलेल्या शिवसेना-भाजपा युतीच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीत मनसे नगरसेवकाचे नाव असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.

या आघाडीत 56 सदस्य आहेत. ही आघाडी आगामी 5 वर्षांसाठी नोंदणीकृत करण्यात आली आहे. तर आपण वैयक्तिक शिवसेनेसोबत नसून राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील भाजपा, अपक्ष, रिपाइं डेमोक्रेटीक यांच्यासोबत आहोत.

विकास कामांच्या आधारे आपण महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठींबा दिल्याचे मनसेच्या राज वानखेडे यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 20, 2010 01:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close